शासनाने गठीत केलेल्या समितीच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी समक्ष हजर राहून मांडले म्हणणे
नळदुर्ग ,दि.१६
राज्य शासनाने महसूली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरबदल करणे,किंवा नवीन कार्यालय निर्मिती करणे/तालुक्याचे निकष ठरविणे याबाबत शिफारशी करण्यासाठी राज्य शासनाने निवृत्त सनदी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑक्टोबर 2023 रोजी अभ्यास समिती स्थापन केली आहे,महसूल विभागा अंतर्गत स्थानिक पातळीवर स्वतंत्र नवीन कार्यालय करणे कार्यक्षेत्रात फेरबदल करणे ,त्यासाठी आवश्यक पद निर्मिती करणे,आवर्ती व अनावर्ती खर्चाचा तपशील याबाबीसह हि समिती शासनाकडे शिफारस करणार आहे,
सद्या या समितीचे कामकाज चालू असून,सर्व सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बाबी,सामाजिक परिस्थितीत झालेले बदल,व इतर अनुषंगिक बाबींमुळे महसूल कामकाजाशी संबंधित येणाऱ्या महत्वपूर्ण सूचना मागविण्यासाठी दि-15 फेब्रुवारी पर्यंत ईमेल द्वारे व दि-16 फेब्रुवारी रोजी पुणे येथे सदस्य सचिव तथा उपायुक्त पुणे विभाग यांच्या कार्यालयात समक्ष हजर राहून सूचना देण्यासाठी ह्या समितीने जाहीर आवाहन केले होते.
त्यानुसार नळदुर्ग मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार मनविसे तालुका उपाध्यक्ष गणेश बिराजदार यांनी नळदुर्ग तालुका व महसूल कार्यालया बाबत सदस्य सचिव तथा उपायुक्त पुणे यांच्या समोर बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून मुद्देसूद भूमिका ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले व सूचना सादर केल्या, सूचनेसोबत दिलेल्या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,मनविसे तालुका उपाध्यक्ष गणेश बिराजदार आदीच्या स्वाक्ष-या आहेत.