शिवजयंती निमित्त युनिटी कंपनीकडुन घेण्यात आले  विद्यार्थ्यांसाठी भव्य  निबंध व चिञकला  स्पर्धा ; १३ शाळेचे जवळपास १ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
  
नळदुर्ग,दि.१०

रयतेचा राजा छञपती शिवाजी महाराज यांच्या
 जयंतीचे  औचित्य साधुन युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतुने  नळदुर्ग येथिल अंबाबाई मंदिर सभागृहात शनिवार रोजी भव्य  निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेतल्या .युनिटी कंपनीने घेतलेला हा स्तुत्य उपक्रम वव विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. या स्पर्धेत जवळपास १ हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास सोसायटीचे माजी चेअरमन मुकुंद नाईक हे होते.  तर उदघाटन  माजी नगरध्यक्ष शहबाज काझी यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्रीमती इनामदार या उपस्थित होत्या.  

अंबाबाई मंदिर सभागृहात शनिवार रोजी घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेत नळदुर्ग व परिसरातील जि.प शाळा व खासगी शाळेचे मिळुन 
 जवळपास एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
 मंदिरचा सभागृह पूर्णपणे भरून बाहेरचे मैदान पण भरले होते.

यावेळी नळदुर्ग पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे,  पत्रकार विलास येडगे,  पत्रकार प्रा. पांडुरंग पोळे, शिवाजी नाईक , उत्तम बणजगोळे ,खुदावाडी विकास सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे, माजी नगरसेवक सुधीर हजारें,आंबाबाई देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश जाधव,पत्रकार दादासाहेब बनसोडे,  लतीफ शेख,  भगवंत सुरवसे,  सुनिल गव्हाणे, राजेद्र महाबोले,  सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार  युनिटीचे जनसंपर्क आधिकारी विनायक अहंकारी यानी मानले.

सहभागी शाळा -
1 हुतात्मा बाबुराव बोरगावकर शाळा कारखाना
2 - जवाहर विद्यालय अणदूर
3 वसंतराव नाईक आश्रम शाळा वसंतनगर
4 - सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरियल स्कुल नळदुर्ग
5 - श्री. श्री. रवीशंकर गुरुकुल अणदूर
6 - डॉ. आंबेडकर इंग्लिश स्कुल नळदुर्ग
7 - जि. प. मुलींची शाळा नळदुर्ग
8 - जि. प. प्रशाला नळदुर्ग
9.- न्याशनल मराठी शाळा नळदुर्ग
10 - अजंनी प्रशाला नळदुर्ग
11 - लाल बहादूरशास्त्री माध्यमिक शाळा होर्टी
12 - धारित्री विद्यालय आपलं घर नळदुर्ग
13 भैरवनाथ विद्यालय चिकुंद्रा
 
Top