निखिल वागळे यांच्यावरील  हल्ल्याचा पत्रकार संघाकडून जाहीर निषेध

मुरूम, ता. उमरगा, दि. १०  

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुरूम पत्रकार संघ व महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (दि. १०) रोजी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांना निवेदन देत भ्याड हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 


या निवेदनात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील झालेल्या हल्ला हे पूर्वनियोजित हल्ला आहे. अनेक ज्येष्ठ पत्रकारावर राज्यात भ्याड हल्ले वारंवार होत आहेत. सरकार लोकशाहीच्या चौथ्या   स्तंभावर हल्ला होत असताना बघ्याची भूमिका घेत आहे.  यामुळे सरकारकडूनच लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतो, असा संशय येत आहे, असे नमूद करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मुरूम पत्रकार संघ व महाराष्ट्र पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी पत्रकार प्रा. डॉ. महेश मोटे, राजेंद्र कारभारी, रफिक पटेल, महेश निंबर्गे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, नहीरपाशा मासुलदार, रामलिंग पुराणे, हुसेन नुरसे, अजिंक्य मुरूमकर, अचलेरचे पत्रकार जगदीश सुरवसे, तुगांवचे रमेश राठोड आदी पत्रकार  उपस्थित होते.
 
Top