दिपाली वाघमारे यांचे सुयश
वागदरी(एस.के.गायकवाड):
वागदरी ता.तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार सोमा वाघमारे यांची कन्या कुमारी दिपाली राजकुमार वाघमारे यांनी बी.काँम भाग एक या वर्गात सन-२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात मेरीटचे गुण मिळवून रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (आर.पी.काँलेज) धाराशिव (उस्मानाबाद) या महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) च्या वतीने सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांत घेण्यात आलेल्या बि.ए.बि.काँम.व बि.एस्सी. पदवी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत बि.काँम.भाग एक या परिक्षेत दिपाली वाघमारे यांनी मेरीटचे गुण मिळवून उत्तीर्ण होऊन या परिक्षेत आर.पी.काँलेज धाराशिव मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख,जिमखाना प्रमुख प्रा.अजिंक्य रेणके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या सहीनिशी प्रशस्तीपत्र देवून महाविद्यालयाच्या वतीने दिपाली वाघमारे याना सन्मानीत करण्यात आले.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल वागदरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभिनंदन करण्यात येत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.