नळदुर्ग येथे डॉ. आंबेडकर स्कूलच्या वतीने आकांक्षा वाघमारे यांचा गौरव
-
वागदरी ,दि.०६
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनँशनल इंग्लिश मेडिअम स्कूलच्या वतीने आकांक्षा दुधाजी वाघमारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
गुजनूर ता.तुळजापूर येथील कुमारी आकांक्षा वाघमारे ही नुकतेच झालेल्या तलाठी भरती पुर्व स्पर्धा परीक्षा गूणानुक्रमे उत्तीर्ण झाली असून लवकरच ती महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी म्हणून सेवेत रुजू होणार आहे. त्याबद्दल डॉ.आंबेडकर इंटरनँशनल इंग्लिश मेडिअम स्कूलच्या वतीने मुख्याध्यापिका कविता पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक मारुती खारवे ,सहशिक्षक विशाल महाबोले,जनक गायकवाड,सुरेश गायकवाड, शिवाजी जाधवर,सुरेश राजमाने, सहशिक्षका समिना खतिब, सदाफ शेख,रंजना घोडके, स्वाती मुळे, शबाना शेख, पवार, मोहरीर आदी उपस्थित होते.