रिपाइंच्या जिल्हा मेळाव्यास उपस्थित राहाण्याचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांचे आवाहन
वागदरी, दि.०६ एस.के.गायकवाड
आगामी लोकसभा,विधानसभा , स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धराशिव (उस्मानाबाद) येथे दि.२६ फेब्रुवारी रोजी आयोजित रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) च्या जिल्हा मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश जाँइंट सेक्रेटरी तथा जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी नळदुर्ग येथे बैठकीत बोलताना केले.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी धाराशिव येथे रिपाइंच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्या मेळाव्याच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने डॉ.आंबेडकर इंग्लिश मेडिअम स्कुल नळदुर्ग सभागृहात तुळजापूर तालुका स्तरिय बैठक जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे प्रदेश सचिव एस.के.चेले, रिपाइंचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष पोपट लांडगे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे, जिल्हा संघटक पद्माकर धावारे,आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या स्वागता नंतर गुजनूर ता.तुळजापूर येथील कुमारी आकांक्षा दुधाजी वाघमारे यांनी तलाठी भरती पुर्व स्पर्धा परीक्षा गूणानुक्रमे उत्तीर्ण झाल्याबद्दल रिपाइंच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस.के.चेले, आनंद पांडागळे, पोपट लांडगे, तानाजी कदम जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद कांबळे आदिंची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली.
याप्रसंगी रिपाइंचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, नळदुर्ग शहराध्यक्ष मारूती खारवे, युवा आघाडी तालुका सरचिटणीस शुभम कदम,गुजनूर चे सरपंच फुलचंद वाघमारे, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागीले, रिपाइंचे तालुका संघटक सुरेश लोंढे,जेष्ठ कार्यकर्ते प्रताप कदम, रिपाइंचे जयभीम वाघमारे,दत्ता बनसोडे,देवानंद लोंढे, आंबादास डावरे,मधुकर डावरे, दिपक वाघमारे, जनार्धन वाघमारे, आरविंद लोखंडे, सौदागर गायकवाड,राहुल वाघमारे,युवा कार्यकर्ते विजय सुरवसे,आमित लोंढे,लाडाप्पा माने,कांचन वाघमारे, भटक्या विमुक्त पारधी समाज संघटनेचे संस्थापक पंडीत भोसले,महिला कार्यकर्त्या छायाबाई वाघमारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी तर सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले. अभार रिपाइं युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे यांनी मानले.