भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी विजय शिंगाडे यांची नियुक्ती
काटी,दि.०६
भारतीय जनता पक्षांतर्गत येत असलेल्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी तुळजापूर तालुक्यातील कसई येथील रहिवासी तथा ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांची प्रदेशाधयक्ष चंद्रशेखर बावकुळे यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीचे पत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते देण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील जुने आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या विजय शिंगाडे यांची तुळजापूर विधानसभा मतदार संघात वेगळी अशी ओळख आहे.
तुळजापूर तालुक्यातील कसई येथील सरपंच पदापासून ते भाजप तालुकाध्यक्ष व भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंत अशा विविध पदांवर यांनी काम पाहिले असून संघटनात्मक पातळ्यांवरही त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ह्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ह्यांनी शिंगाडे यांची प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे. भविष्यात भारतीय जनता पार्टी पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंगाडे यांनी ह्या नियुक्ती नंतर सांगितले.
या निवडीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. मिलिंद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, सुपरवॉरीयर्स मराठवाडा विभागीय सहसमनव्यक तथा तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड.अनिल काळे, जिल्हा परिषदेचे माजी नेताजी पाटील, खंडेराव चौरे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा सरचिटणीस दिपक आलुरे, तुळजापूर विधानसभा निवडणुक प्रमुख विक्रमसिंह देशमुख,रामदास कोळगे, प्रभाकर मुळे आदींनी शिंगाडे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.