खुनी हल्ल्यातील जखमीचा अखेर मृत्यु : तब्बल तेरा दिवस दिली मृत्युशी झुंज ; तुळजापूर तालुक्यातील घटना
नळदुर्ग ,दि.२३ एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील नरखोरी तांडा जळकोटवाडी येथे वीटभट्टीवर मजुर म्हणून कामास असलेल्या सहदेव महादेव मस्के यांच्यावर विठभट्टी मालकानेच धारदार शस्ञाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते.सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होता. अखेर या प्राणघातक हल्ल्यातील जखमी सहदेव मस्केचा दि.२२ फेब्रुवारी २०२४ दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, वीट भट्टी चालक उत्तम राठोड यांनी जिवे मारण्याच्या उद्देशानेच माझे वडील सहदेव महादेव मस्के यांच्यावर दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ११.३० वा.दरम्यान कुराडीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद अक्षय सहदेव मस्के यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या प्राणघातक हल्ल्यातील जखमी सहदेव मस्के सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला . सदर घटनेतील आरोपीवर गुन्हा नोंद झाला असला तरी या प्राण घातक हल्ल्यातील जखमी सहदेव मस्के यांचा मृत्यु झाल्याचे कळविण्यासाठी नातेवाईकानी संबंधित तपास आधिकारी याना फोन केला असता त्यांनी बेजबाबदार पणे भाषा केल्याचे समजते. तरी वरिष्ठानी सदर प्रकरणी जाणिव पुर्वक लक्ष देवून या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून मयत कुटुंबला योग्य तो न्याय द्यवा अशी मागणी होत आहे.अन्यथा रिपाइं (आठवले) च्या वतीने यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा एस.के गायकवाड यानी दिला आहे.