येडोळा येथे शिवजयंती निमित्ताने मिरवणूक

वागदरी (एस.के.गायकवाड):
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तुळजापूर तालुक्यातील  येडोळा येथे सहवाद्द भव्य मिरवणूक काढण्यात आली.
   
येडोळा येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी गावातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून शिवजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली.


  यावेळी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमर जाधव,उपाध्यक्ष कन्हैया जाधव,माजी सरपंच पद्माकर पाटील, बंटी पाटील, डिगंबर पाटील, चेतन जाधव,आकाश जाधव,योगेश जाधव, सचिन जाधव,सतिश जाधव, महीपालसिंग चव्हाण, सागर चव्हाण, रोहित पवार, शुभम चव्हाण, नवनाथ जाधव,धोंडीबा केदार, नितीन पवार, सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, राम लोंढे, अमित लोंढे, प्रविण कांबळे, सुरज लोंढे, बबन सास्तुरे,नागेश जाधव,सह ग्रामस्थ युवा कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top