एस.टी.बस स्टेरिंगवर महिला चालकाने मिळवला ताबा , प्रवाशात आश्चर्य , कौतुक व आभिनंदन
वागदरी, दि.२९:एस.के.गायकवाड
जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारात एस.टी.बसच्या स्टेरिंगवर महिला चालक विराजमान झाली असून दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.०० वा.दरम्यान महिला चालकानी पहिल्याल्यांदाच सोलापूर येथून एस.टी.बस घेऊन नळदुर्ग बसस्थानकात प्रवेश करताच एस.टी.बस प्रवासांनी त्यांचे कौतुक करून आभिनंद केले.
सोलापूर ते नळदुर्ग, नळदुर्ग ते सोलापूर एसटी बस सेवेची स्टेरिंग महिला चालकाच्या हाती देण्यात आली असून सोलापूरवरुन सकाळी सात वाजून ३० मिनिटांनी सुटणारी सोलापूर ते नळदुर्ग ही पहिली फेरी व दुसरी गाडी आठ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी सोलापूर नळदुर्ग नळदुर्ग सोलापूर पहिली फेरी दुसरी फेरी दहा वाजता सुटते. नळदुर्गवरुन परत दहा वाजता नळदुर्ग ते सोलापूर सुटते असे मिळून प्रत्येक दोन दोन फेऱ्या दुपारपर्यंत होतात व दुपारी दोन नंतर पुन्हा तीन फेऱ्या बस करतात. विशेष म्हणजे दि.८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दि. २८फेब्रुवारी बुधवार रोजी सोलापूर नळदुर्ग बस क्रमांक एम एच १४ बी टी ही बस महिला चालक श्रीमती अंजना राठोड व वाहक विजय लक्ष्मी सुतार, दुसरी गाडी क्रमांक एम एच ४० सीएम ६२८९ सोलापूर ते नळदुर्ग चालक शितल प्रल्हाद शिंदे व वाहक महिला ही बस नळदुर्ग एसटी स्टँडवर आली असता नळदुर्गहून सोलापूरकडे जाणारे प्रवाशी या महिला चालकास पाहुन आश्चर्यचकित झाले . याबाबत आम्ही दोन्ही बसमधील प्रवाशांसी संवाद साधला असता प्रवाशांनी म्हटले की, महिला चालक एक नंबर चांगली बस चालवीत आहेत. त्याबद्दल नळदुर्ग वाहतूक नियंत्रक गुंडाप्पा डुकरे व अणदुर बसस्थानक वाहतूक नियंत्रक मुकुंद वैद्य व महिला वाहक श्रीमती विजय लक्ष्मी सुतार याने त्यांचे कौतुक केले आहे व सर्व प्रवाशाकडून त्या महिला चालकाचे अभिनंदन होत आहे.