धाराशिव येथे लिंबू मिरची तोडा, विज्ञानाशी नाते जोडा, अभियानास उत्सर्फुत प्रतिसाद
नळदुर्ग (एस.के.गायकवाड)
अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा धाराशिवच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने अंधश्रद्धेपोटी नवीन रिक्षा, गाडी,घर बंगला खरेदी केले की नजर लागून काहीतरी अनर्थ घडूनये म्हणून गाडीला घराच्या चौकटीला लिंबू मिरची बांधतात ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.या विषयी जाणीव जागृती करण्याकरिता धाराशिव येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून लिंबू मिरची तोडा विज्ञानाशि नाते जोडा हे आभियान राबविण्यात आले असून या आभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दि.१ मार्च रोजी धाराशिव येथे दि.२८ फेब्रुवारी राष्ट्रिय विज्ञान दिनाचे औचित्य साधून गुरुवर्य एम.डी देशमुख यांच्या वाढदीवसानिमित्त धाराशिव अनिसच्या वतीने विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शाळा कॉलेज मध्ये विज्ञाना विषयी मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने चमत्कारां मागिल विज्ञान प्रयोग दाखवण्यात आले, तसेच विज्ञान प्रश्न मंजुषा घेण्यात आली, तसेच धाराशिव बस स्थानक परिसरात अटो रिक्षा वाले यांचे सोबत लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा प्रतेक्ष जाऊन प्रभोदन करण्यतआले,
या कार्यक्रमात अनेक मण्यवर सहभागी झाले होते. त्यामध्ये.. ॲड. तनुजा हेडा , निलेश राऊत,अब्दुल लतीफ, ॲड अजय वाघाळे, गणेश वाघमारे, ॲड. बाळासाहेब जाधव, सुरेश शेळके, शहर वाहतूक पोलिस प्रभाकर कांबळे, व त्यांचे सहकारी, तसेच परिसरातील व्यवसायिक,ऑटोरिक्षा चालक उपस्थित होते.