नळदुर्ग,दि.०१
 
 युनिटी मल्टिकाॕन्स प्रा. लि. कंपनीकडून विविध उपक्रम साजरे केले जातात. नुकतेच शिवजयंती निमित्त कंपनीच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवार  रोजी भुईकोट किल्ल्यातील बारादरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत  पार पडले. 


युनिटी आयोजित निंबध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कृती कदम, द्वितीय मयुरी घोडके, तृतीय ज्ञानेश्वरी पवार, तर महेक पठाण, आकांक्षा जगताप यांचा अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक आला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक तुळशी मुरमुरे, द्वितीय जानकी माताडे, तृतीय ज्ञानेश्वरी माळी तर पूजा सगर व श्रूती कुताडे यांचा चौथाव पाचवा क्रमांक आला. यशस्वी विद्यार्थ्यांना युनिटी तर्फे रोख रक्कम, पदक व सन्माणपत्र देऊन गौरवण्यात आले.


यावेळी शहबाज काझी, सुभद्रा मुळे, कविता पुदाले, सुनील पुजारी, नितीन कासार, मुश्ताक कुरेशी, शिवाजी मोरे, शफी शेख, सुशांत भुमकर, मारुती खारवे, ज्ञानेश्वर घोडके, पञकार विलास येडगे, उत्तम बणजगोळे, दादासाहेब बनसोडे, उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार विनायक अहंकारी यांनी मानले.

यावेळी युनिटीकडून मराठी भाषा दिनानिमित्त नळदुर्ग शहरातील मराठी विषयाच्या गुरुजींचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर युवा कुस्तीपटू समर्थ मारुती घोडके आणि मंदार मकरंद पाटील या दोन कुस्तीपटूचा युवा क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी  शहबाज काझी व जुबेर काझी यांनी मान्यवराचा सत्कार केला.
 
Top