नळदुर्ग , दि.०२ 

 भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या  प्रयत्नाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील  नळदुर्ग शहरासाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन त्यामध्ये शहरात बसवसृष्टी विकसित करणे, वसंतराव नाईक उद्यान विकसित करणे, अंबाबाई मंदीर येथे सभागृह बांधणे, त्याचबरोबर इ--लायब्ररी व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरीता अद्ययावत अभ्यासिका करणे ,या प्रमुख कामांसह विविध विकास कामे करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांनी दिली आहे.
       

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक नळदुर्ग शहराची विकासाकडे  वाटचाल सुरू आहे. शहरात विकास कामे करण्यासाठी आमदार  पाटील यांच्या प्रयत्नामुळे भरभरून निधी उपलब्ध होत आहे. यापुढे संपुर्ण विकास आराखड्यातील रस्ते व गटार बांधकाम करण्यासाठी ९३ कोटी रुपये, त्याचबरोबर शहराची सर्वात गंभीर पाणीपुरवठयाची समस्या लक्षात घेऊन पुढील ३० वर्षासाठी पाणीपुरवठा आराखडा तयार करून त्यासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे नगर, नग्रोउत्थान योजना यासाठी १८ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकुण १५४ कोटी रुपयांचा निधी नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातुन मंजुर झाला असल्याचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांनी म्हटले आहे.
        

त्याचबरोबर नुकतेच वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्ग शहराच्या विकासासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.या निधीमधुन बसवसृष्टी विकसित करणे, वसंतराव नाईक उद्यान विकसित करणे, अंबाबाई मंदिर येथे सभागृह बांधणे, इ--लायब्ररी व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अद्ययावत अभ्यासिका करणे आदी कामे करण्यात येणार असल्याचे उदय जगदाळे यांनी म्हटले आहे. नळदुर्ग शहराचा सर्वांगिण विकास होऊन नळदुर्ग शहर एक विकसित शहर व्हावे यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील हे प्रयत्न करीत असल्याचे उदय जगदाळे यांनी म्हटले आहे.

नळदुर्गसाठी मंजुर झालेल्या  ६ कोटी रुपये निधीतील विकास कामे

१) बसवसृष्टी विकसित करणे २ कोटी रुपये.
२) वसंतराव नाईक उद्यान विकसित करणे १ कोटी रुपये.
३) अंबाबाई मंदिर येथे सभागृह बांधणे ४० लाख रुपये.
४) इ--लायब्ररी व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची अद्ययावत अभ्यासिका करणे १ कोटी रुपये.
५) प्रभाग क्र.१ मध्ये संरक्षक भिंत व गटार दुरुस्त करणे ३० लाख रुपये.
६) प्रभाग क्र.४ मध्ये रस्ते व गटार करणे ३० लाख रुपये.
६) प्रभाग क्र.५ मध्ये रस्ते व गटार करणे ३० लाख रुपये.
७) प्रभाग क्र.७ मध्ये रस्ते करणे ३० लाख रुपये.
८) प्रभाग क्र.८ मध्ये जैन समाजासाठी सभागृह बांधणे ४० लाख रुपये.
 
Top