तामलवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक
शैलेश पवार रुजु ; वडगाव (काटी) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशीलकुमार चव्हाण यांची बदली झाल्याने त्यांना नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले होते. नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरिक्षक शैलेश पवार यांचा वडगाव (काटी) चे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना शैलेश पवार यांनी तामलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक, पदाधिकारी, पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन तामलवाडी हद्दीतील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, वडगांव (काटी)चे सरपंच गौरीशंकर कोडगीरे, उपसरपंच प्रकाश डावरे,सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब नलावडे,माजी चेअरमन दगडू चूंगे,माजी चेअरमन मधुकर (बप्पा)चुंगे , बबन पाटील,सुखदेव चुंगे, अमोल नलावडे,संतोष कापसे, जितेंद्र काळे, शिवाजी साखरे, अमोल सावळे,बबलू अस्वले, अनंतराव म्हमाने,राहुल म्हमाणे, रियाज पठाण,विनोद कोडगीरे, गहिनीनाथ सावळे,शहाजी शिंदे, अण्णाराव (मामा)शेंडगे,मनोज चुंगे पोलीस कर्मचारी शिवाजी शिरसट,गोपनीय ठाणे अंमलदार आकाश सुरनर,राठोड आदींसह ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.