दि.९ फेब्रुवारी : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस
भारतीय राजकारणात अनेक नेत्यांना-राज्यकर्त्यांना आपल्या वाडावडिलांचा- पूर्वजांचा राजकीय वारसा प्राप्त झाला अन् त्यातून ते सत्तास्थानी विराजमान झालेत.परंतु मा.एकनाथजी त्याला अपवाद आहेत.त्यांनी आपल्या
कार्यकर्तुत्वाने शून्यातून विश्व निर्माण करत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा यशस्वी राजकीय प्रवास केला.हीच खरी त्यांच्या राजकारणातून समाजकारण करण्याची फलश्रुती आहे.त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कोरोना काळात त्यांनी लोकनेत्याच्या भूमिकेतून तनमनधनाने रुग्णसेवा करत जीवाची बाजी मारून राज्यातील लाखो लोकांचे प्राण वाचविले.अशा धैर्यशाली रुग्णदुतास राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला,ही ठाणेकरांच्या दृष्टीने मोठ्या भाग्याची गोष्ट आहे."आमचा घरचा माणूस मुख्यमंत्री झाला",अशी मानसिकता ठाणेकरांची झाली.महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या शिवसेनेला मजबूत करण्यासाठी
शिंदेसाहेब हे गेल्या चार दशकांपासून हिंदुत्वाशी नाळ अटूट ठेवत निष्ठापूर्वक काम करत आहेत.त्याचं फलित म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं,असे म्हणणे योग्य ठरेल.
शिवरायांच्या महाराष्ट्रातील मराठ्यांचा सात दशकापासून प्रलंबित पडलेला आरक्षणाचा प्रश्न अखेर सातारच्या शिंदे घराण्यातील संभाजीरावांचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून मार्गी लागला.त्यामुळे राज्यात सर्वदूर मराठा समाजाच्या सदस्यांनी हर्षोल्हासात गुलाल उधळत विजयश्री साजरी केली.तसेच त्यांनी शिंदे
सरकारला कोटी कोटी धन्यवाद दिले.गेल्या सात दशकात राज्यात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले,परंतु त्यातील एकानेही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात रस दाखविला नाही.परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याला अपवाद ठरले अन् त्यांनी हे आरक्षण अवघ्या दीड वर्षाच्या कारकिर्दीत मिळवून दिले.चला तर करूया...शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा!
सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचा ध्यास घेतलेल्या भाईंनी आपल्यावर कोसळलेल्या दोन लेकरांच्या आकस्मिक दुःखाचा डोंगर बाजूला सारून केवळ *ठाणे* च नव्हे तर, सारा महाराष्ट्र हेच माझं कुटुंब मानून,
शिंदेसाहेबांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने लोकहिताची कामे करण्यास स्वतःला झोकून घेतलं."आधी करून दाखवायचं नंतर बोलायचं" ही भूमिका स्वीकारून त्यांनी आपली राजकारणातून समाजकारणकडे वाटचाल सुरू केली.आई जगदंबे,भाईंना
रुग्णसेवेसाठी उदंड आयुष्य देवो,अशी चरणी प्रार्थना👏
शिवछत्रपतींच्या साताऱ्याच्या जन्मभूमीची माती ललाटी लावून शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न साकारण्यास *ठाणे* या सांस्कृतिक नगरीत शिंदेसाहेबांनी पदार्पण केलं अन् त्यांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली.शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल,परखड अन् ओजस्वी वाणीनं प्रेरित होऊन,तर धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या
शिकवणीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा भगवा ध्वज हाती घेतला आणि बघता-बघता त्यांचं राजकीय,सामाजिक व आध्यात्मिक जीवन भगवामय झालं.
"क्षत्रिय मराठा बाणा" जपून रुग्णसेवेसाठी आपला जीव पणाला लावणाऱ्या लोकनेत्याचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी *सातारा जिल्ह्यातील *जावळी क्षेत्रातील दरे* या छोट्याश्या
गावी आई गंगूबाई संभाजीराव यांच्या उदरी झाला.अन् महाराष्ट्रात हिंदुत्वाची ज्योत तेजोमय करण्यासाठी जणू तो सूर्यावानी उदयास आला.
सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले श्रीमान संभाजीराव नवलू शिंदे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती.या पार्श्वभूमीवर साऱ्या कुटुंबियांसह ठाणे येथे स्थायिक होऊन भाईंनी उदरनिर्वाहसाठी रिक्षाचालक म्हणून जीवनाची सुरुवात केली.त्यानंतर आपल्या कठोर परिश्रम,निष्ठा,प्रामाणिकपणा व नेतृत्वगुणाच्या जोरावर रिक्षाचालकांची मने जिंकून त्यांनी ठाणे रिक्षा युनियनचे अध्यक्षपद भूषविलं.मात्र त्याआधी त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण किसननगर येथील महापालिकेच्या शाळा न.३ मध्ये,तर माध्यमिक शिक्षण कोपरी-ठाणे येथील मंगला विद्यालयात पूर्ण केलं.त्यानंतर मात्र त्यांचं पुढील शिक्षण आर्थिक विवंचनेमुळे खंडित झालं.तथापि,त्यामागील मुख्य कारण होतं,ते म्हणजे श्रीकांतदादांचं डॉक्टर होऊन गोरगरिबांची आरोग्य सेवा करण्याचं स्वप्न साकार करण्याचं.असं असूनही त्यांनी पुढील शिक्षण घेण्याची जिद्द व दुर्दम्य इच्छा मात्र आपल्या मनात कायम जिवंत ठेवली.कालांतराने त्यांनी कोरोनाशी लढा देत असताना आपल्या जिद्द व अभ्यासूवृत्तीच्या बळावर आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. काहीही होवो,कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही,हा त्यांच्या स्वभावातील जणू स्थायीभावच! कारण जेथे संकट तेथे *अनाथांचे नाथ एकनाथ* हे हजर आहेतच,असे गृहीत धरा.मग वादळ असो वा अतिवृष्टी;रस्त्यावरील अपघाताची घटना असो वा इमारत दुर्घटना; किंवा एखाद्या गोरगरीब निर्धन रुग्णाला अर्थसहाय्यची निकड.....अशा व अन्य संकटकाळाच्या वेळी मदतीचा हात देण्यास *लोकनाथ* प्रगट झालेच समजा.आहो..इतकेच काय,जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोनाने देखील एकनाथांना घाबरून महाराष्ट्रातून धूम ठोकली होती,हे राज्यातील सर्वधर्मीय लोकांनी प्रत्यक्ष अनुभवले. हाच खरा भाईंचा राजकारणातून समाजकारण करण्याचा करिश्मा आहे.
दरम्यान आपल्या सामाजिक कार्य करण्याच्या आवडीने अन् कठोर परिश्रमाने त्यांनी दिघेसाहेबांचा विश्वास संपादन केला.त्यातून पुढे त्यांना शाखा प्रमुख होण्याची संधी दिली.त्या पदास देखील त्यांनी न्याय दिला.तेथेही भाईंनी शिवसेनेसाठी रात्रंदिवस निष्ठेने काम करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांची मने जिंकली,अन् तेथूनच त्यांच्या भाग्याची कवाडं उघडलीत.परंतु दुर्दैवानं एक काळा दिवस उजाडला.अन् २६ ऑगस्ट २००१ रोजी दिघेसाहेबांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू होऊन ठाणेकरांवर दुःखाची अवकळा पसरली.संपूर्ण ठाणे शहर सुन्न झालं होतं.प्रत्येकाला आपल्या घरातील थोरली व्यक्ती गेल्याचे दुःख झालं.त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी ठाणे जिल्हा प्रमुखाची जबाबदारी शिंदेसाहेबांना सोपविली. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाचं उत्तरदायित्व यांच्या हाती आलं.सर्वांना बरोबर घेऊन आत्मविश्वासाने कार्य करत स्व.दिघेसाहेबांचे पवित्र पद आजमितीपर्यंत त्यांनी समर्थपणे सांभाळले,याचा ठाणेकरांना सार्थ अभिमान आहे.मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना हे पद माजी महापौर श्री.नरेश म्हस्के यांना सोपविले.शिंदेसाहेबांच्या लोकप्रियतेचा आलेख असाच पुढे सरकत गेला.त्याचाच एक भाग म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी २००४ च्या सार्वत्रिक
निवडणुकीत कोपरी-पाचपाखाडी विधानसभेची निवडणूक लढण्याची भाईंना संधी दिली.त्या संधीचं सोनं करून त्यांनी या क्षेत्रात मोठ्या मताधिक्याने विजयश्री संपादन केली.खरं तर,त्यांच्या समाजोपयोगी कामांची ही पावतीच आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
ठाण्याचे भाग्यविधाता धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा आदर्श घेऊन
शिंदेसाहेब हे ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिले आहेत.त्यांच्या सामाजिक कार्यांची जनमानसावर छाप पडून त्यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर २००९,२०१४ अन् १०१९ या विधानसभा निवडणुकींमध्येही विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा दारुण पराभव करुन भाईंनी ठाणे जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवला.कारण ते मुळातच राजकारणातून समाजकारण करण्यावर भर देत आले आहेत,हे सर्वज्ञात आहे.
धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या पश्चात ठाणे जिल्ह्याची शिवसेना सावरून भाईंनी पुन्हा भक्कम पायावर उभी केली. शाखा प्रमुख,नगरसेवक,आमदार,ठाणे जिल्हा प्रमुख अन् कॅबिनेट मंत्री आणि आता *मुख्यमंत्री* असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.
दरम्यान शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र-बेळगाव सीमा आंदोलनात अग्रेसर असताना त्यांनी बेल्लारी तुरुंगात चार महिने तुरुंगवास भोगला.त्यांचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी असलेले गांभीर्य पाहून,त्यांची समन्वयक मंत्री म्हणून तत्कालिन सरकारने नियुक्ती केली.सदर आंदोलनांचे नेतृत्व करताना त्यांनी अनेक गुन्हे आपल्या अंगावर घेतले.जिल्हा प्रमुख म्हणून विविध आव्हानांना समर्थपणे तोंड देत,त्यांनी ठाणे जिल्ह्यात व आसपासच्या क्षेत्रात शिवसेनेचा गड मजबूत राखला. संवेदनशीलता,संयम,साहस,कठोर परिश्रम अन् संघर्ष हे गुण आत्मसात करून त्यांनी आपले शून्यातून विश्व निर्माण केले.आम्ही ठाणे जिल्ह्यातले सर्वधर्मीय लोक खरोखर भाग्यवान आहोत,ज्यांना शिंदेसाहेबसारखा लोकहितवादी नेता लाभला.
नगर विकास विभागाचे माजी प्रधान सचिव भूषण गगराणी हे शिंदेसाहेबांविषयी म्हणतात,"आमदार असताना त्याच्यात जो साधेपणा व नम्रता पाहिली,तोच साधेपणा व नम्रता आजही मंत्री झाल्यावर त्यांच्या प्रेमळ वागणुकीतून प्रकर्षाने दिसून येतो.राज्याचे मंत्री म्हणून त्यांच्यात अहंभाव वा बडेजावपणा तसूभरही नजरेत आला नाही.त्यामुळे आम्हा अधिकाऱ्यांमध्ये मोठा आत्म निर्माण होऊन,त्यातून शासकीय कामांचा निपटारा जलदगतीने व पारदर्शकतेने झाला.सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी ते नेहमी आग्रही असतात.यावरून हे सिद्ध होते की,शिंदेसाहेब हे राजकारणी कमी,तर समाजकारणी जास्त वाटतात".
दरम्यान शिंदेसाहेबांचा कामांचा सपाटा पाहून जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्य मंत्र्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.जवळजवळ आठ महिन्यांचा हा कार्यभार त्यांनी समर्थपणे सांभाळून आपल्या कार्याचा ठसा उमटविला.शिंदे साहेबांनी डॉक्टरांची प्रलंबित ८०० रिक्त पदे भरून राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम केली.दुर्गम व आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या ७३२ बीएएमएस डॉक्टरांच्या सेवा नियमित केल्या.आशासेविकांची प्रलंबित वेतनवाढ मंजूर करून त्यांना दिलासा दिला.ग्रामीण भागातील लोकांची औषधोपचाराची सोय व्हावी,या उद्देशाने त्यांनी राज्यातील उप जिल्हा रुग्णालयांना १०२ डायलिसिस मशिन्स सुपूर्द करून दिल्याने ग्रामस्थांना आता आरोग्य सेवेसाठी शहराकडे धाव घेणे कायमचे थांबले.महत्वाचे म्हणजे राज्यातील आदिवासी भागांमधील कुपोषणाची समस्या मिटविण्यासाठी *मेळघाट पॅटर्न* लागू केला.त्यातून ही समस्या मिटविणारे ना.एकनाथ शिंदे हे राज्यातील पहिले आरोग्यमंत्री ठरले.शिंदेसाहेबांच्या बाबतीत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही खात्याची जबाबदारी दिली,तरी ते त्यास न्याय दिल्याशिवाय रहात नाहीत.यावरून त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीची व सेवाभावीवृत्तीची प्रचिती येते.
मा.शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन" या द्वय सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये सुमारे २५०० आरोग्य शिबिरे आयोजित केल्याने राज्यातील सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे.त्यामुळे कोरोना काळात लोकांच्या आरोग्याचे खऱ्या अर्थाने रक्षणच झाले.म्हणूनच त्यांना
रुग्णदुत संबोधिले जाते.
यापूर्वी राज्यात गोरगरीब लोकांचे व त्यांच्या पाल्यांचे महागडे ऑपरेशन्स(शस्त्रक्रिया ) पैशांअभावी होऊ न शकल्याने त्यांना आपले जीव गमवावे लागायचे.यावर रामबाण उपाय शोधून रुग्णदुत ना.एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये गोरगरीब,निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे महागडे ऑपरेशन्स मोफत किंवा अल्पदरात होऊ लागले आहेत.त्यातून जीवन जगण्याची नवी उमेद त्यांच्यात निर्माण होत आहे,ही दिलासा देणारी गोष्ट आहे.आतापर्यंत २०,००० हून अधिक शस्त्रक्रिया मोफत वा अल्पश्या दरात सुखरूप पार पडल्या आहेत.याशिवाय गोरगरीब व निराधार लोकांच्या लहान मुलांच्या हृदयावरील छिद्राचे ठाणे येथील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये गेल्या चार वर्षांपासून मोफत ऑपरेशन्स होत आहेत.आजमितीपर्यंत सुमारे ४,६०० मुलांचे हृदयावरील छिद्राचे मोफत ऑपरेशन होऊन ती लहान मुलं-मुली आता सुदृढ व निरोगी जीवन जगत आहेत.हे सत्कर्म मा.एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हातून झाले आहे.त्यास डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे प्रमुख श्री.मंगेश चिवटे व त्यांच्या वैद्यकीय टीमचे भरीव योगदान लाभलं आहे.त्याचं राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे.या पार्श्वभूमीवरच राज्यातल्या लोकांनी शिंदेसाहेबांना *अनाथांचा मसिहा* ही उपमा दिली आहे.ही रुग्णसेवा जात,धर्म,पंत अन् राजकारण ह्या गोष्टी बाजूला सारून होत आहे,हीच पुरोगामी महाराष्ट्राची खरी ओळख आहे.रुग्णसेवेचं हे नेत्रदीपक कार्य राज्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींना अन् संस्थांना पथदर्शक ठरेल,हे निश्चित.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्यासारख्या निःस्वार्थी व सदाचारी गुरूंच्या सानिध्यात जडणघडण झालेले एकनाथजी हे पुढील काळातही राजकीय व सामाजिक जीवनात नेहमी यशाची उत्तुंग शिखरे गाठतील,हे निश्चित.गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात ठाणे-गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून
शिंदेसाहेबांनी सर्वधर्मीय लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी अन् त्याबरोबरच कोरोना नियंत्रित करण्याकरिता कोविड हॉस्पिटल्स अन् अन्य वैद्यकीय साधनसामग्री ज्या गतीने उपलब्ध करून दिली,त्याची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे.आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी मोठ्या हिमतीने कोरोनाशी लढा दिला आहे.दरम्यान त्यांना दोन वेळा अन् सुपुत्र,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना देखील दोन वेळा कोरोनाची लागण झाली.तथापि त्याची तमा न बाळगता,शिंदे पिता-पुत्राने त्यावर सहज मात करून पुनश्च कोरोनाशी निखराचा लढा दिला अन् कोरोनाला
शिवरायांच्या राज्यातून हद्दपार केलं.हेच खरे शिंदेसाहेबांच्या
कार्यकर्तुत्वाचे फलित होय.
महाराष्ट्रामध्ये *मोतीबिंदूमुक्त अभियान* राबविला जात असून,दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट गाठले जाणार आहे.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना एक नवी दृष्टी प्राप्त होताहे,ही दिलासा देणारी गोष्ट आहे.७५ वर्षांवरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एस.टी. बसेसचा प्रवास मोफत करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय शिंदे सरकारने घेतला.यामुळे ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना अन् देवस्थानांना भेटी देणे सुकर होऊन,त्यातून त्यांना आनंद व विरंगुळा मिळत आहे.त्याचप्रमाणे राज्यातील महिलांना वयाची अट न लावता त्यांना सरसकट अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली आहे.या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी शिंदेसाहेबांना मन:पूर्वक धन्यवाद दिले.खरं तर,शिंदे सरकारने हे फार मोठं सत्कर्म केलं,असे अभिमानाने म्हणावे लागेल.
जागतिक अपंग दिनी म्हणजेच मागील ३ डिसेंबर,२०२२ रोजी शिंदे सरकारने दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी *स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय* स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.महत्वाचे म्हणजे सदर मंत्रालयासाठी सातत्याने राज्य सरकारकडे मागणी करणारे,अपंगांचे आश्रयदाते आमदार बच्चूभाऊ कडू यांना राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आला.यालाच खऱ्या अर्थानं राजकारणातून समाजकारण करणे म्हणतात.
उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून आता ५० हजार रुपये देण्याचा शिंदे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला,हे शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीतलं मोठं पाऊल म्हटलं जातं.जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी,या प्रांजळ उद्देशाने त्यांच्या रजा १२ वरून २० दिवस केल्याची अनोखी भेट त्यांना शिंदे सरकारने दिली आहे.याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांनी शिंदे सरकारचे आभार मानले.
राज्यातील लोकांचे आरोग्याचे रक्षण करण्याबरोबरच त्यांना पंचतारांकित दळणवळणच्या पायाभूत सुविधा देण्यासंदर्भात देखील शिंदेसाहेबांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम)म्हणून पूर्णक्षमतेने काम केलं.राज्यातील रस्त्यांचा विकास,त्यांचं बांधकाम अन् देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यरत आहे.
एवढं करून भाई थांबले नाहीत.मुंबई-सिंधुदुर्ग असा रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा *ग्रीन फिल्ड कोकण द्रुतगती* चा महामार्ग तयार होत असून,त्यामुळे कोंकण विभागातील औद्योगिक व पर्यटन विकासासह या क्षेत्राचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे.या व्यतिरिक्त ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीला जाणारा रस्ता ; शीळ- कल्याण रुंदीकरण ; ठाणे घोडबंदर उन्नत रस्ता ; वडाळा-घाटकोपर ठाणे मेट्रो ; ठाणे शहरअंतर्गत मेट्रो प्रकल्प ; कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक ;वांद्रे-वर्सावा सी लिंक प्रकल्प ; मुंबई पश्चिम किनारपट्टीवरील कोस्टल महामार्ग प्रकल्प आदी तत्सम पब्लिक प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे राज्यभरातील दळणवळण प्रक्रिया गतिमान होईल,हे नक्की.शिवडी-न्हावाशेवा सागरी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून,त्यामुळे नवी मुंबई ते मुंबई अंतर केवळ २० मिनिटात पार करता येत आहे,ही मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे.वास्तवात नागरी जीवन अधिक सुखकर,
विनाअडथळ्याचं व्हावे हा शिंदेसाहेबांचा मानस आहे,हे प्रतिबिंबित होते.
समृद्धी महामार्ग हा *ड्रीम प्रोजेक्ट* पूर्वाश्रमीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी या प्रकल्पाची उभारणी जलदगतीने व्हावी,या उद्देशाने त्यास चालना दिली.त्याद्वारे १० जिल्हे,२६,तालुके अन् ३९३ खेडींची दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.हा प्रोजेक्ट राज्यातील लोकांना वरदान ठरला असून,अवघ्या ८ तासात मुंबई-नागपूर अंतर पार करता येऊ लागले,ही कौतुकास्पद गोष्ट आहे.त्यास हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले.हीच खरी ना.एकनाथ शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीतली सार्वजनिक बांधकाम खात्याची विकासगाथा होय.पण आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्वाश्रमीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे आता मुख्यमंत्री झाल्याने राज्याला समृद्धीकडे नेणाऱ्या *समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न* झाले.याबद्दल राज्यातल्या सर्वधर्मीय नागरिकांनी मा.पंतप्रधान आणि राज्यातल्या महायुती सरकारला धन्यवाद दिले.याशिवाय नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधानाच्या हस्ते झाले.सी एच एम टी ते वडाळामधील मेट्रो || मार्गाला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली.त्यातून एक जागतिक दर्जाची वाहतूक सुविधा नागरिकांना मिळेल,अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली.याबद्दल
एमएमआरडीए अन् महामुंबई मेट्रोचे
शिंदेसाहेबांनी कौतुक केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचे तीन प्रमुख पक्षांचे नेते एकमेकांशी समन्वय अन् संवाद साधून राज्याला विकासाच्या दिशेने नेत असल्याने महाराष्ट्र हे देशाच्या नकाशावर आदर्श व वैभवशाली राज्य ठरेल,हे निश्चित.या त्रय
लोकनेत्यांच्या
महायुतीच्या काळात
*हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र राज्य विधिमंडळाच्या सभागृहात* लावले गेले,याचा
शिवसेनाप्रेमींना अभिमान आहे.तसेच बाळासाहेबांची जयंती सरकारी कार्यालयांमध्ये दरवर्षी साजरी करण्याचा शिंदे सरकारने घेतलेला निर्णय खरोखर प्रशंसनीय आहे.खरं म्हणजे *हिंदुत्व* *हा बाळासाहेब अन् मोदीजी यांच्यातील समानतेचा धागा होता*,याची प्रचिती या महायुतीच्या निर्मितीतून प्रतिबिंबित होते.ही गोष्ट प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या दृष्टीने गौरवाची आहे.
*योगगुरू रामदेवबाबा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीविषयी म्हणतात,*एकनाथजी शिंदे हे हिंदूधर्माचे गौरवपुरुष आहेत.* मराठी जनमानसाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट म्हणजे *जय जय महाराष्ट्र माझा* या गौरवशाली गाण्याला *राज्यगीता* चा दर्जा प्राप्त झाला.यामुळे शिवछ्त्रपतींच्या महा..राष्ट्र राज्याच्या सोनेरी मुकुटावर आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला आहे.
ठाणे शहरातील धोकादायक अन् मोडकळीस आलेल्या इमारतींतल्या लोकांचे जीवन सुरक्षित करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी पूर्वाश्रमीचे नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी आपल्या अथक प्रयत्नांतून *क्लस्टर डेव्हलपमेंट योजना* कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने सिडको व ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करार घडवून आणला.पहिल्या टप्प्यात किसननगरमध्ये हे काम सुरू करण्यात येत आहे.*गेली दोन दशके क्लस्टर योजनेसाठी जो लढा दिला,त्याची ही फलश्रुती आहे*,असे विधान शिंदेसाहेबांनी त्याप्रसंगी केले.या महत्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे ८ ते १० लाख ठाणेकरांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळून,त्यांचे सुंदर घरकूल मिळण्याचं स्वप्न साकार होईल,हे निश्चित."आमदार झाल्यानंतर २००४
सालापासून मी सदर योजनेसाठी लढत आहे.अखेर आज या योजनेस मान्यता मिळाली,ही माझ्या दृष्टीने समाधानाची तर,ठाणेकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे",असे भावनिक उदगार त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी २५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.पालकमंत्री म्हणून पद ग्रहण केल्यावर सर्वप्रथम त्यांनी नक्षलवादी कारवायांचा बीमोड अन् पोलीस सक्षमीकरणासाठी ५६ कोटीचा निधी मंजूर करून घेतला.विशेष म्हणजे
नक्षलवादाचा मार्ग सोडून,आत्मसमर्पण केलेल्या दोन कुटुंबांना सर्वतोपरी मदत करून त्यांना आपलेसं करून त्यांच्यात मन परिवर्तन घडवून आणलं.त्यांना काय वाईट अन् काय चांगलं यातील फरक समजावून ,त्यांच्या मनातील सरकार व पोलीस दलाविषयीचे गैरसमज दूर केलेत.शिंदेसाहेबांनी एक पाऊल पुढे टाकून,गोरगरीब व गरजू लोकांना जगण्यासाठी रोजगार मिळवून देण्यास त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केलेत,जेणेकरून *त्या* लोकांनी पुनश्च नक्षलवादी कारवायांची वाट धरू नये.त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय करून,त्यांचा आत्मसन्मान जागविला.त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण केली.खरं तर,ना.एकनाथ शिंदे यांनी *दगडाला देवपण देण्याचं सत्कर्म केल्याने ते संत एकनाथांचं प्रतिक असल्याचं सिद्धीस येते.
दरम्यान *महाड दुर्घटने* त मरण पावलेल्या दोन कुटुंबियांच्या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे सोपविली.इतकेच नव्हे तर,त्या मुलांच्या नावे प्रत्येकी १० लाखांची एफ.डी.काढून दिली.*चिमुकल्या प्रियांशी* ची गोष्ट तर वेगळीच होती.ह्या नवजात मुलीच्या कुटुंबातील आईसह प्रत्येक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह अन् ती मात्र एकटी निगेटिव्ह होती.ही गोष्ट कळताच शिंदेसाहेब त्या चिमुकलीच्या मदतीला धावून आले.भाईंनी तातडीने त्या मुलीला घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या सौ.मुदलियार यांच्याकडे जाऊन ती चिमुकली सोपविली.मग वीस दिवसानंतर तिची आई बरी झाल्यावर भाईंनी स्वत:च्या हाताने ती चिमुकली आईकडे सोपविली.सदर प्रसंग अतिशय हृदय हेलवणारा होता.मुलीला पाहिल्यावर आईच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते.खरं तर,त्यावेळी सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू झळकत होते.*त्या* आईनं शिंदेसाहेब आणि सौ. मुदलियार मॅडमचे पदस्पर्श करून अनंत आभार मानले.त्यामुळे येथील सर्वधर्मीय नागरिक त्यांना संकटसमयी मदतीला धावून येणारा *देवदूत* म्हणतात.
असेच एक उदाहरण ठाणे येथील नौपाडा परिसरातील आहे.जेथेही पूर्वाश्रमीचे पालकमंत्री मदतीला धाऊन गेले.*नौपाडा येथील पार्वती निवासस्थानाला मोठी आग* लागली होती.त्यात दोन घरे बेचिराख झाले होती.या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने शिंदेसाहेबांनी तत्कालिन महापौर नरेश म्हस्के यांच्याशी बोलून सदर पिडित कुटुंबांना घर देण्याच्या सूचना दिल्या.लगेचच नुकसानग्रस्त कुटुंबियांना नवीन घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.*कु.गुलाम हौस* या मुलाचा एक पाय अन् एक हात एका दुर्घटनेत कापला गेला होता.त्याला कृत्रिम पाय व हात बसविण्यात सर्वतोपरी सहकार्य केले.त्याप्रमाणेच *पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील *साक्षी दाभेकर* ह्या क्रीडापटू मुलीचे एका दुर्घटनेत एक पाय कापला गेला होता.तिचे के ई एम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून तिला एक कृत्रिम पाय बसविण्यात आला.त्यासह तिला ५ लाखांची मदतही
शिंदेसाहेबांनी दिली.या पार्श्वभूमीवरच शिंदेसाहेबांना *गोरगरिबांचा आधारवड* असे संबोधिले जाते.
मित्रहो,महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित होऊन बंद पडलेलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुनश्च सुरू करून राज्यातील गोरगरीब,निर्धन,गरजू लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. अन् गेल्या दीड वर्षात राज्यातील सुमारे १९००० हून अधिक दूर्भर आजारांच्या रुग्णांना १५६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं,हा उच्चांक वैद्यकीय क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरला आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.या महत्वपूर्ण
कामासाठी मुख्यमंत्र्यांनी मंगेश चिवटेसारख्या उच्च विद्याविभूषित,धाडसी
कार्यतत्पर अन्
कर्तव्यदक्ष रुग्णसेवकाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती केली.त्याची परिणती म्हणजे सदर कक्षाच्या कामकाजाला मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होऊन गोरगरीब लोकांचे महागडे ऑपरेशन्स मोफत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.*मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आपल्या दारात* हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गेल्या वाढदिवशी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी शुभारंभ झाला.या उपक्रमाव्दारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अन् त्या अंतर्गत येणाऱ्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती राज्यातील गरजू लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे.*गोरगरिबांचे हित हेच आमचे ब्रीद* या आधारावर जिल्ह्या-जिल्ह्यात दौरे केले जात आहेत.राज्यातल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे दालन रात्री १० वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा
शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला.त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचे आरोग्य व अन्य तत्सम प्रश्न जलदगतीने सुटू लागले आहेत.या पार्श्वभूमीवरच शिंदेसाहेबांना सर्वधर्मीय जनता *लोकहितवादी नेता* म्हणून संबोधित असते.
सर्वात महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यातील ३०
खाटांच्या खाजगी रुग्णालयांमध्ये देखील गोरगरीब रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची मुभा दिली असून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून संबंधित रुग्णाला अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. या वैद्यकीय सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांची मोठी सोय झाली असून,त्यांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज राहिली नाही.या पार्श्वभूमीवर
शिंदेसाहेबांना राज्यातील सर्वधर्मीय लोक *जनसामान्यांचा मुख्यमंत्री* असे म्हणायला लागले आहेत.वास्तवात हीच खरी त्यांच्या रुग्णसेवेची पावती आहे.दिवसातील किमान १८ तास काम करून लोकनेते एकनाथजी
शिंदेसाहेब हे राज्यातील शेवटच्या माणसाला न्याय देण्यास कटिबद्ध आहेत. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांची भयावहता लक्षात घेऊन *हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना* योजनेअंतर्गत राज्यात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्यभरात ७०० आरोग्य केंद्रे उभारले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.एकनाथजी खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे *आरोग्य रक्षक* आहेत,हे कोरोना काळात प्रत्ययास आले.
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे सुकर व्हावे,या उद्देशाने शिंदेसाहेबांनी राज्यात जेथे जेथे गरज आहे,तेथे तेथे डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे सुमारे २५० रुग्णवाहिका वितरित केल्या.ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब लोकांच्या वैद्यकीय औषधोपचाराची व
ऑपरेशन्स सोय व्हावी,या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाण्यात आपल्या *स्व.आईंच्या स्मरणार्थ मातोश्री गंगूबाई संभाजीराव शिंदे मल्टीप्लीसिटी हॉस्पिटलची निर्मिती* केली.आज तेथे हजारो
आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक हे मोफत उपचार घेताहेत.हे तर खरं अर्थाने पुण्यकर्मच आहे,जे आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ शिंदेसाहेब करताहेत.त्यामुळेच त्यांना जनमानसात *अनाथांचे नाथ एकनाथ* म्हणतात.
*बळीराजा* हा अखिल मानवजातीचा पोशिंदा आहे.या पार्श्वभूमीवर त्यांच्या कष्टाचे-मेहनतीचे योग्य मोल देणं,सरकारचे आद्य उत्तरदायित्व आहे.महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याचा सुपुत्रच आज राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने त्याची जबाबदारी वाढली आहे.शिंदेसाहेबांनी अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरीव मदत केली,याबद्दल साहेबांचे मनस्वी आभार.खरं तर,शेतकरी सुखी तर,जनता सुखी हे ध्यानी ठेऊन त्यांनी राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांना भेटी देऊन तेथील नुकसानीची पहाणी केली अन् तातडीने अर्थसहाय्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.शेतकऱ्यांची
तनमनधनाने काळजी घेणारे अन् त्यांना संकटसमयी मदतीचा हात देणारे शिंदेसाहेब यांची तुलना माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्याशी करणं बहुतांशी योग्य ठरते.
आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत राज्यातील गोरगरीब,गरजू,मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरकुल,शिक्षण,रोजगार-स्वयं रोजगार,आरोग्य हे मूलभूत प्रश्न मार्गी लागोत अन् त्यांच्या जीवनात सुख - समृद्धी येवो,हीच सदिच्छा! आपल्या कार्यकाळात अन्नदाता बळीराजाच्या आत्महत्या कशा थांबतील,या दृष्टीने ठोस उपाययोजना व्हाव्यात.कृषी विषयक
जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावत,त्यांची आर्थिक उन्नती व्हावी.त्यासह आपलं राज्य सुजलाम सुफलाम होण्यासाठी ठोस पावलं उचलावीत.राज्यातील बेरोजगारी दूर होण्यासाठी राज्य सरकारने विविध शासकीय आस्थापनांमधील रिक्त पदे त्वरेने भरावीत.*महिलांची सुरक्षितता* या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.आदिवासी क्षेत्रातील माता व बालकांचे कुपोषण थांबविण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणा सक्षम कराव्यात,म्हणजे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.मुंबईतील कामगार व पोलीस यांना त्यांच्या स्वप्नातील घरकुलं त्वरेने उभारून द्यावीत.सध्याच्या महागाईच्या अनुषंगाने *दिव्यांगांच्या पेन्शन* मध्ये भरीव वाढ करण्यात यावी,असे आपणास कळकळीचे सांगणे आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी *निष्ठावान शिवसैनिकाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे*,हे स्वप्न पाहिलं होतं.ते स्वप्न ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण झालं,याचा राज्यातील तमाम शिवप्रेमींना सार्थ अभिमान आहे.
ना..शिंदेसाहेबांसाठी या दोन ओळी..
तू न थकेगा कभी ,
तू न रूकेगा कभी ,
तू न मुडेगा कभी ,
कर शपथ,कर शपथ*, *अग्निपथ..अग्निपथ!
जय 🇮🇳हिंद !जय 🚩महाराष्ट्र!
लेखक -रणवीरसिंह राजपूत
गवर्नमेंट मीडिया,महाराष्ट्र शासन,
सहकार्य - मंगेश चिवटे
मुख्यमंत्र्यांचे ओ.एस.डी मंञालय,