नळदुर्ग ( प्रा.डॉ. दिपक जगदाळे )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील प्राणीशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.सी.जे. हिवरे यांची विद्यापीठाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या कार्यालयात बुधवारी त्यांनी कार्यभार स्विकारला. तसेच यूजीसीचे अध्यक्ष जगदीशकुमार यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली. डॉ. चंद्रशेखर हिवरे यांनी नोकरी करत - करत गेली तीस वर्ष ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केलेली धडपड पाहूनच सेवा निवृत्तीनंतर ही त्यांना विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी लोकपाल म्हणून नियुक्त केले आहे.
डॉ. सी. जे. हिवरे यांच्या या निवडीमुळे भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीचा त्वरीत निपटारा होणार असल्याने विद्यार्थ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे डॉ. रविंद्र रेड्डी ( हैद्राबाद ), डॉ. मोहन बाबरे , प्रा. शिवाजीराव चौधरी ( नळदुर्ग ) संजय ननवरे ( नांदेड ) डॉ. दिपक जगदाळे डॉ. समीर पाटील , डॉ. हंसराज जाधव , डॉ. महेश मोटे , डॉ. अनिरुद्ध बाबरे , ( नळदुर्ग ) डॉ. शिवाजीराव देशमुख ( अमरावती ) डॉ. विश्वास साखरे (अंबाजोगाई ) डॉ. नितीन पडवळ ( उस्मानाबाद )डॉ. धनराज भुरे ( नांदेड )यांच्यासह नागरिकांनी अभिनंदन केले.