नळदुर्ग तालुक्याच्या निर्मितीसाठी मनसेचा 115 पानी अहवाल जिल्हाधिका-यां मार्फत मुख्यमंत्र्याकडे सादर नगरपालिकेसह 42 ग्रामपंचायतीचा ठराव अहवालात समावेश

धाराशिव,दि.११

नियोजित नळदुर्ग तालुक्याच्या निर्मितीसाठी मनसेचा 115 पानी अहवाल धाराशिव जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याकडे सोमवार दि.११  मार्च रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन  सादर केले  आहे. नगरपालिकेसह 42 ग्रामपंचायतीचा ठराव या अहवालात समावेश आहे.


राज्यात नवीन 49 तालुके निर्मिती होणार असून त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी संकल्पित नळदुर्ग तालुक्याचा 115 पानी अहवाल तयार केला आहे, यामध्ये,निवेदन,नकाशा,प्राथमिक माहिती ,ऐतिहासिक पार्श्वभूमी,सोयी सुविधा,सुविधेचा अभाव,उद्योग धंदे,क्षेत्रफळ,लोकसंख्या,शासकीय पत्रे,विविध समित्याची माहिती,उपलब्ध जागा व इमारती,पालिकेचा ठराव,विविध 42 ग्रामपंचायतीचा ठराव या अहवालात समाविष्ट आहे,राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यासाठी .जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यासाठी .सचिन ओंबासे यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली


 नळदुर्ग तालुक्याच्या निर्मिती बाबत प्रशासकीय यंत्रनेमार्फत शासनाकडे हा अहवाल द्यावा,असे चर्चे दरम्यान पदाधिकाऱ्यांनी विनंती केली,यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,नळदुर्ग शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे ता.उपाध्यक्ष गणेश बिराजदार हे उपस्थित होते.


नळदुर्ग हे पूर्वी जिल्ह्याचे ठिकाण होते या ठिकाणी मामलेदार कचेरी होती,स्वातंत्र्या नंतर हि मुंसिफ कोर्ट हे नळदुर्ग येथेच होते,शहराच्या आसपास 60 गावे असून ग्रामपंचायती 42 आहेत,ज्यांची लोकसंख्या सव्वा लाखाच्या जवळ आहे,ज्या ज्या वेळी राज्य शासनाने तालुका पुर्नरचना समित्या स्थापन केल्या त्या त्या वेळी नळदुर्ग तालुका सोयीस्कर आहे असाच अहवाल दिला होता,परंतु दरवेळी नळदुर्ग वर अन्याय होऊन इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या भागाला सद्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्रास सहन केल्या शिवाय पर्याय नाही,परंतु राज्य शासनाने नवीन तालुके निर्मिती करण्याच्या घोषणे नंतर पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या असून किमान आता तरी नळदुर्ग तालुक्याची निर्मिती व्हावी असे दिलेल्या अहवालातील निवेदनात म्हंटले आहे,

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे,ता.सरचिटणीस गणेश पाटील, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,जनहित कक्षाचे ऍड.मतीन बाडेवाले,शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,मनविसे ता.अध्यक्ष सूरज चव्हाण,ता.उपाध्यक्ष गणेश बिराजदार,शहराध्यक्ष निखिल येडगे यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top