शहापुर येथे कोंबडी चोर भुरट्या चोरांचा सुळसुळाट : ग्रामस्थात भितीचे वातावरण
वागदरी ,दि.१० :एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यतील नळदुर्ग पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या इटकळ औट पोष्ट पोलिस ठाणे हद्दीतील शहापूर येते कोंबडी चोर भुरट्या चोरांचा सुळसुळाट उटला असून ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्मान झाले आहे.
या बाबत मिळालेली माहीती अशी की शहापुर ता.तुळजापूर येथे सलीम चंदुलाल पटेल यांनी,"पटेल चिकन सेंटर" या नावाने किरकोळ चिकन मटण विक्रीचा धंदा सुरू केला असून विक्रीसाठी अणलेल्या १२ कोंबड्या त्यानी लोंखडी तारेची झाळी असलेल्या रँकमध्ये कुलूप लावून ठेवल्या होत्या.दि.९ मार्च रोजी मध्यरात्रीच्या वेळेस सर्वजण भर झोपेत असताना अज्ञात चोरट्यानी झाळीचे कुलूप न तोडता लोंखडी पक्कड कींवा कटरने झाळीच्या तारा कापुन १२ कोंबड्यापैकी सहा कोंबड्या चोरून नेल्या आहेत.यापूर्वीही शहापूर येथील एकाच्या पान टपरीचे तर एका केस कर्तनालय दुकानाचे कुलूप तोडुन गल्यातील पैसे चोरून नेले असल्याचे समजते.
एकंदरीत दिवसेनदीवस नळदुर्ग व परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत. काही दिवसा पूर्वीच नळदुर्ग पासून अवघ्या सहा कि.मी.अंतरावर असलेल्या वागदरी येथे ही एकाची मोटर सायकल तर एकाच्या दोन शेळ्या अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत धाराशिव जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थीती निर्माण होत आहे.पाणी टंचाईच्या झळा जानवत आहेत त्यात चोरीचे प्रकार घडत आहेत. भुरट्या चोरीचे रूपानंतर मोठ्या चोरीमध्ये होऊ शकते.तेंव्हा पोलिसांची गस्त ग्रमीण भागापर्यंत वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.