नळदुर्ग शहरासाठी १५४ कोटींचा निधी आणल्याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा रविवारी नागरी सत्कार ; कामाचे लोकार्पण व कामाचे भूमिपूजनही होणार
नळदुर्ग,दि.०८
नळदुर्ग शहरासाठी १५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील नागरिकांच्या वतीने आ.राणा जगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार रविवारी आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्यावेळी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तर कामांचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागरी सत्कार संयोजन समितीने केले आहे.
आपलं नळदुर्ग ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेलं शहर आहे.जून २०२२ मध्ये राज्यात एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नळदुर्ग शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. रस्ते,नाली,मुबलक पाणी आदी नागरी सुविधासाठी शहरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीला यश मिळाले असून शहराच्या इतिहासात कधी नव्हे एवढा १५४ कोटी रुपयांचा निधी वर्षभराच्या काळात उपलब्ध झाला आहे.
मराठवाडा मुक्ती लढ्यातील स्वतंत्र भारताचे पहिले अशोकचक्र विजेते हुतात्मा बच्चीतरसिंग यांच्यासह लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती उजागर करण्यासाठी स्मारक,महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी भव्य अशी बसव सृष्टी,हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे स्मारक, यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
शहरवासीयांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शहरात आर.ओ प्लांट उभे केले आहेत. आता मुबलक पाणी मिळावे यासाठी पुढील ३० वर्षाचा विचार करून ४८ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. शहरातील डीपी रस्ते व नालीसाठी ९३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.नळदुर्ग ते तुळजापूर या रस्त्याचे रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे.
नळदुर्ग शहरात पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या तरुणांना रोजगार मिळावा,आर्थिक उलाढाल वाढावी यासाठी आमदार पाटील जे नियोजबद्ध प्रयत्न करत आहेत त्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.