महिला दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे विविध विषयांवर संवाद व चर्चा
तुळजापूर ,दि.०८
महिला दिनाचे औचित्य साधून दि. ८ मार्च रोजी तुळजापूर तालुक्यातील आरळी, या गावात महिला दिन साजरा करण्यात आला. ज्ञान प्रबोधिनी हराळी व ॲक्वाड्याम संस्था, आरळी बुद्रुक येथील महिलांनी एकत्रित येत हा दिन साजरा केला. स्व ची ओळख पाणी व महिला यांचा संबंध गाव विकासात महिलांचा सहभाग तसेच महिलांचे आरोग्य कौटुंबिक जबाबदारी समाजाचे दायित्व अशा विविध विषयांवरती संवाद व चर्चा झाली.
यासोबत पाण्याचे महत्व समजण्यासाठी खेळाच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच संगीत खुर्ची लंगडी अशा खेळाच्या माध्यमातून ही महिलांनी लहानपणातील अनुभव पुन्हा या निमित्ताने घेतला. त्यानंतर बक्षीस वितरणही करण्यात आले. सुरुवातीला ज्ञान प्रबोधिनी हराळी या संस्थेचे सुरू असलेले गावातील कार्याविषयी माहिती देण्यात आली. शेवटी गावातील पाण्याची सद्यस्थिती व पाण्याचे पुढील नियोजन याविषयी महिलांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आले. शेवटी महिलांनी आनंद व्यक्त करून असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी गावातील आशा कार्यकर्त्या अश्विनी यादव व अश्विनी व्हरकट यांनी पुढाकार घेतला यावेळी मृत्युंजय विचारे, सर्वेश जोशी, तनम्या काळे, जान्हवी चौथमल, ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे समन्वयक सचिन सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.