बेकायदेशीररित्या दुकाने हटवल्या प्रकरणी चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची संत सेना नाभिक समाजाची मागणी
नळदुर्ग ,दि.०८
शुक्रवार दि. ८ मार्च रोजी नळदुर्ग, अणदूर ,जळकोट परीसरातील संत सेना नाभिक समाजाच्या वतीने तेर येथिल अल्पसंख्यांक (नाभिक , सुतार कारागीर, तांबोळी व ईतर ) समाजातील लोकांचे दुकाने जे.सी.बी.द्वारे पाडल्याने त्यांचे कुटुंब उधवस्त झाले. त्यांना न्याय मिळवुन देण्या संदर्भातील निवेदन पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दिले. या निवेदनावर संदिप सुरवसे नाभिक समाज अध्यक्ष नळदुर्ग,अनिल महाबोले, बाळासाहेब महाबोले,सनिर सुरवसे,दत्तात्रय राऊत सर,प्रविण महाबोले,अभिजित महाबोले, राम भुरे, नागनाथ वाळके,महादेव माने,समर्थ भुरे,रामेश्वर भुरे,रवी सोमवसे,पंडीत माने,नितीन दळवी,हणमंत हिल्लाळ, भिमाशंकर आतकरे,पद्माकर माने,शामआतकरे,बाबा काळे,रविकिरण महाबोले,बालाजी सुरवसे,सोमनाथ महाबोले तुकाराम वाळके इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.