नळदुर्ग येथे जागतिक महिला दिनानिमित्त रिपाइं (आठवले) च्या वतीने कष्टकरी महिलांचा सत्कार

वागदरी, दि.०८ एस.के.गायकवाड

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) च्या वतीने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येते सामान्य कुटुंबातील कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला.
   

दि.८ मार्च जागतिक महिला दिनाना मित्ताने नळदुर्ग येते  रिपाइं (आठव‌ले) च्या वतीने येथील बसस्थाकातील नवनाथ रसवंतीग्रहात कष्ठकरी महिलांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पती बरोबर ऊसाचा रस गाळूण आपला व्यवसाय सांभाळणारी छायाबाई रामदास कांबळे व महाराष्ट्र होमगार्ड पोलिस दलात कार्यरत असलेली महिला होमगार्ड राधाबाई गायकवाड यांचा बंजारा समाजातील महिला सुरेखा रठोड यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.
 

या प्रसंगी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, तालुका संघटक सुरेश लोंढे,अनिल वाघमारे,शिवसेना (शिंदे गट)जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,माजी सैनिक मधुकर लोखंडे,वहातुक नियंत्रक महेश डुकरे,होमगार्ड सचिन चव्हाण,शिवलाल राठोड, राम झेंडारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित  होते.
 
Top