हायटेक इंग्लिश स्कूलच्या वार्षिक संमेलनात चिमुकल्यांची धमाल
मुरूम, ता. उमरगा, दि. ८
येणेगूर, ता. उमरगा येथील हायटेक इंग्लिश स्कूलच्या वतीने दोन दिवशीय स्नेहसंमेलनात ४२९ चिमुकल्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पहिल्या दिवशी बुधवारी (ता. ६) रोजी दीपप्रज्वलन व नटराज प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन लातूरचे सपोनि एस. आर. वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोउनि नवनाथ गाडेकर, स्कूलच्या मुख्याध्यापिका सरस्वती मोरे, सरपंच रेखाताई गुंजोटे, उमरगा येथील विवेकवर्धिनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुकुमार जकेकुरे, पत्रकार संभाजी पाटील, शरद गायकवाड, निजगुण स्वामी, योगेश पांचाळ, प्रकाश कंटेकुरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण जकेकुरे होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ७) रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक अनिल संगशेट्टी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे होते. शिवअण्णा जकेकुरे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार व फेटा बांधून सत्कार केला. एकदताय या गणेशच्या गीताने सादरीकरणास प्रारंभ झाला. आमच्या पप्पांनी गणपती आणला, रामायण गीत, हळदी कुंकू नाटिका, मराठी मालिका, मिक्स गाणे (इ. ८ वी) च्या विद्यार्थिनी, मेरा रंग दे बसंती चोला (इ.४ थी), मकना रिमिक्स, देश भक्तीपर (इ.२ री), काही रिमिक्स गीतावर लोकांनी ठेका धरला व एकापेक्षा एक बहारदार गीते, नाटक अशा भरगच्च कार्यक्रमाने गावकऱ्यांना बालकलाकारांनी खेळवूण ठेवले.
दिमाखदार आयोजन केल्याबद्दल शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. राजेंद्र कुमार, योगेश कांबळे, महादेव मंगरूळे, ईरप्पा मंडले, एस. एस. इंगवे, प्रतिभा पांचाळ, राधिका मंडले, प्रतिभा कांबळे, पोतदार, वर्षा सोलापूरे, अल्का हिंगमिरे, संध्या सागर, राणी कांबळे, मयुरी देशमुख गौरी जामगे, धनश्री पाटील आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचलन महेक पठाण, श्रेया घोरपडे, रक्षिता लुटे, श्रुती गायकवाड, साक्षी चौगुले, अमित रेड्डी तर आभार दिलीप ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप वंदेमातरम आणि राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद विद्यार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठयासंख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : येणेगुर, ता. उमरगा येथील हायटेक इंग्लिश स्कूलच्या संमेलनात रामायण नाटिका सादर करताना बालकलाकार