महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात पूजन, भाविकांची गर्दी

मुरूम दि.०८, 

मुरूम शहरातील अशोक चौक,किसान चौक महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळी शिवलिंगावर विधिवत अभिषेक,बेल अर्पण पूजन संपन्न झाले.


 सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती. किसान चौकातील श्री महादेव मंदिरातील जोडलिंगेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती, अनेक वर्षांपासूनचे हे जुने मंदिर आहे, जुन्या काळात झालेले दगडी बांधकाम, लेणी काम,विविध दगडी मुर्त्या, या मंदिर परिसरात पहायला मिळते. विशेष म्हणजे काशी नंतर धाराशिव जिल्ह्यातील जोडलिंगेश्वर असलेले हे एकमेव मंदिर असल्याचे पूर्वजा पासून वारंवार चर्चा होत असते, चौकातील नागरिकांनी पुढाकार घेऊन अडगळीत पडलेल्या मंदिराला त्याचे महत्व व त्याची माहिती संकलित करीत आहेत, मंदिर परिसरात नुकतेच अनेक कामे संपन्न झाले आहेत. व मंदिराला उजाळा देण्याचा प्रयत्न येथील नागरिक करीत आहेत.


 दि.०६ वार शुक्रवार रोजी महाशिवरात्री निमित्त जोडलिंगेश्वर लिंगावर विधिवत अभिषेक करण्यात आले, भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, शहरातून विविध भागांतील नागरिकांनी या मंदिरातील जोडलिंगेश्वराचे दर्शन घेतले.
 
Top