मुरुम येथील रामभक्त अयोध्येकडे रवाना
मुरुम, ता. उमरगा, दि.७
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे भव्य अशा राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याची प्राणप्रतिष्ठा देखील करण्यात आली. त्यानंतर रोजच अनेक रामभक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्याकडे जात आहेत.
अनेकांना अयोध्याला जायची इच्छा असतानाही जे रामभक्त जाऊ शकत नव्हते, अशा रामभक्तांसाठी महाराष्ट्र भाजपच्या वतीने व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आस्था विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. राज्यभरातून ३८ रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुरूम शहरातील १४ रामभक्त मंगळवारी रोजी हे अयोध्यासाठी धाराशिव येथून निघालेल्या रेल्वेने रवाना झाले. तत्पूर्वी मुरूम भाजप कार्यालयात भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्याकडे जाणाऱ्या शिवराम जाधव, बालाजी माने, बाबुराव डोईजोडे, भरत ख्याडे, संजय ख्याडे, शिवराज येवले, लक्ष्मण येवले, जितेंद्र राठोड, बाबुराव बेगमपुरे, विजयसिंग चौहाण, राजशेखर हिरेमठ, मल्लिनाथ मुडे, महादेव गिरिबा, मल्लिनाथ गिरीबा या १४ राम भक्तांचा सत्कार केला. यावेळी अरविंद फुगटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, उपाध्यक्ष सुनिल निलवाडे, आकाश क्षीरसागर, रतन मुडे, अजय जाधव, रोहित स्वामी, चंदू वाकले, रणजित शिंदे, शिवराज गिरीबा, शंकर गायकवाड, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांचा भाजप कार्यालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार करताना श्रीकांत मिणीयार, कार्यकर्ते व रामभक्त