सावरगावात 43 लाखाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
तुळजापूर,दि.१६
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या खासदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या 43 लाखाच्या विविध कामाचे भूमिपूजन शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर, उपसरपंच रामेश्वर तोडकरी, चंद्रदोन माळी, रमेश काडगावकर, हनुमंत गाभणे, संजय कोळी, भारत तानवडे ,ओंकार काडगावकर ,कानिफनाथ माळी, सचिन जोशी, गंगाधर गाभणे ,कुमार कांबळे इत्यादींच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पार पडला. 43 लाखाच्या निधीतून सावरगाव सिमेंट रस्ता, हिंदू स्मशान भूमी, सिमेंट रस्ता सावता माळी मंदिर सभा मंडप बांधणे आदी कामे होणार आहेत.