रिपाइं (आठवले) च्या वतीने नळदुर्ग येथे समता सैनिक दलाचा वर्धापण दिन साजरा
नळदुर्ग ,दि.१५ : एस .के. गायकवाड
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी समाजाच्या आत्मसन्मानासाठी व स्वसंरक्षणासाठी स्थापण केलेल्या समता सैनिक दलाचा वर्धापण दिन रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) नळदुर्ग (ता.तुळजापूर) शहर शहर शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे हे होते. समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे व योगेश सुरवसे यांचा रिपाइंच्या वतीने शाल फेटा पुष्पहार पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना राजरत्न बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी राजकीय चळवळीकरीता रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली तर बौध्द धम्म कार्यासाठी भारतिय बौध्द महासभा व स्वसंरक्षणाकरिता समता सैनिक दलाची स्थापना केली असून बाबासाहेबांचा हा विचार युवकानी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
यावेळी रिपाइं (आठवले) युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे,नळदुर्ग शहराध्यक्ष मारूती खारवे,तालुका कार्यकारणी सदस्य दत्ता बनसोडे, जळकोट शाखा अध्यक्ष आरविंद लोखंडे,बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे,सेवानिवृत नायब सुभेदार दिगंबर बनसोडे,आण्णाराव सोनकांबळे,बापु दुरूगकर,चंद्रकांत बनसोडे,पोपट वाघमारे,हरी गायकवाड,रमेश शिंदे, मधुसदन दुरुगकर, शारदा गायकवाड यासह कार्यकर्ते उपस्थित होते.