तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे मोफत साडी वाटप
वागदरी , दि.१५
वागदरी ता.तुळजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार मार्फत महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंत्योदय रेशन कार्ड धारकासाठी सुरू करण्यात आलेल्या योजने अंतर्गत मोफत साडीचे वाटप करण्यात आले.
वस्रोउद्योग विभाग महाराष्ट्र शासनाकडून अंत्योदय शिधाञिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी कँप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत एक साडी मोफत देण्याचा या वर्षापासून निर्णय घेतला असून नुकतेच वागदरी ता.तुळजापूर येथील स्वस्तधान्य दुकानदार ज्ञानेश्वर पाटील यानी येथील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरूजी यांच्या हस्ते एकुन १४ अंत्योदय लभार्थी शिधापञिका धारक महिलाना प्रत्येकी एक या प्रमाने साडीचे वाटप केले.यावेळी भाजपा मेडिया सेल तुळजापूर तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ सह महिला,कार्यकर्ते उपस्थित होते.