विनया गोविंद घंटे हिने सातारा सैनिक स्कुलच्या प्रवेश परिक्षेत यश  मिळविल्याने शाळेच्या वतीने  गौरव

नळदुर्ग , दि.१५

शहरातील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता  पाचवीत  शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कु विनया गोविंद घंटे हिने  सैनिक स्कुलच्या प्रवेश  परिक्षेत यश मिळाले  असुन सातारा सैनिक स्कुलमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल शाळेच्यावतीने तिचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तर तिचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

कु विनयाने   सैनिक स्कुल प्रवेश परीक्षेत 300 पैकी 217 गुण मिळवून उत्कृष्ट यश मिळवले आहे. 
विनया ही लहानपणापासूनच हुशार आणि मेहनती मुलगी आहे. ती अभ्यासात नेहमीच अव्वल असते. शाळेतील सर्व कार्यक्रमात सुद्धा ती सक्रियपणे भाग घेत असते. तिच्या या यशामुळे  शाळेतील इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळणार नाही. तिला पालक गोविंद घंटे वर्गशिक्षक श्रीमती जयश्री  धुमाळ,  मुख्याध्यापक भास्कर मस्के  , सहशिक्षक सुंदर भालकाटे, वंदना चौधरी, सुरेखा मोरे, बिलाल सौदागर,  यांच्या प्रोत्साहनामुळे, पालकांच्या प्रेरणेमुळे विनया हिला हे यश मिळाले आहे.  मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून विनया हिच्या यशाबद्दल विस्तार आधिकारी शोभा राऊत , केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव व शालेय व्यस्थापन समितीनी  अभिनंदन करुन  पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Top