नळदुर्ग शहर विकासाकरिता भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार पाटील यांचा झाला जल्लोषात नागरी सत्कार
नळदुर्ग, दि.१४
शहर विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने अमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे दि.१२ रोजी नळदुर्ग शहरात भव्य नागरी सत्कार मोठ्या जल्लोषात करण्यात आला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरासाठी आतापर्यंत १५४ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल शहरवासीयांच्या वतीने मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी शहरातील ऐतिहासिक किल्ला गेट येथे आमदार पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की, नळदुर्ग शहराच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न् मार्गी लागणार आहे. पाणी परवठा योजनेसाठी ४८ कोटीचा निधी मिळाला आहे. याकामाचे टेंडर प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच पाणी पुरवठा योजनेच्या कामासा सुरूवात करण्यात येणार आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर नागरीकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
नियोजित नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न् मार्गी लावण्यासाठी आपण वचनबध्द आहे. त्याचबरोबर शहरात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसात तहसील कार्यालय नळदुर्ग येथे सुरू होईल. या भागात औद्योगिक वसाहात निर्मितीसाठी प्रयत्न् सुरू आहेत. राज्यातील शिंदे - फडणवीस यांच्या कालावधीत तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्हयात विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध् झाला आहे. भविष्यातही विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन अमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले. कार्यक्रमाचे सुञसंचलन सुनिल बनसोडे , संभाजी कांबळे यानी केले.
तत्पूर्वी शहरात यापूर्वी केलेल्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा व नव्याने करण्यात येत असलेल्या कामांचा शुभारंभ आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोषा बोबडे,अनंद कंदले, अॕड. दीपक अलुरे, वसंत वडगावे, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, सुशांत भुमकर, नय्यर जहागिरदार, शफी शेख, संजय बताले उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्व्र घोडके, अजित जुनैदी, शहराध्यक्ष धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, विलास राठोड, बबन चौधरी, सागर हजारे, गणेश मोरडे , अबुलहसन रजवी, रियाज शेख, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.