नळदुर्ग जि.प. शाळेची मुलं हुशार

नळदुर्ग,दि.२२

 येथील जि.प.कें. प्राथमिक शाळेस अचानक शाळा भेट करत शिक्षण अधिकारी (प्राथमिक ) अशोक पाटील यांनी पहिली ते पाचवी वर्गास भेट दिली.  विद्यार्थ्यांची मराठी, गणित व इंग्रजी विषयाची गुणवत्ता तपासणी करत प्रश्न विचारले. सर्वच वर्गातील मुलांनी योग्य उत्तरे ऐकून अशोक पाटील यांनी समाधान व्यक्त केले तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाढे विचारताना एकोणिसचा पाढा पाठीमागे बसलेल्या विद्यार्थ्यांने न अडखळता व अचूक  म्हणून दाखवल्याबद्दल पहिलीचे विद्यार्थी व वर्गशिक्षिका सुंदर भालकटे यांचे कौतूक केले. 

असे वर्गशिक्षक असल्यास जि.प.चे विद्यार्थी यशास्वी होतील असे श्री पाटील म्हणाले. तसेच नळदुर्ग जि.प.कें. प्रा. शाळेची स्तुती केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी मेहरूनिसा ईनामदार, विस्तार अधिकारी शोभा  राऊत, केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव, मुख्याध्यापक भास्कर मस्के, शिक्षक बिलाल सौदागर, सुंदर भालकटे, वंदना चौधरी, जयश्री धुमाळ, सुरेखा मोरे उपस्थित होते.
 
Top