मतदानासाठी विद्यार्थ्यांनी लिहिले आई-वडिलांना पत्र

वागदरी, दि.२५ एस.के.गायकवाड

नळदुर्ग येथील ज्ञानदीप कलोपासक मंडळ संचलित धरित्री विद्यालय आलियाबाद येथे विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावे यासाठी भावनिक हाक घालणारे पत्र लिहिले या पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना लोकशाहीचे महत्त्व मतदानाचे महत्त्व आपले कर्तव्य याविषयी माहिती देऊन आई-वडिलांनी वेळात वेळ काढून मतदान करावे असे पत्र लिहिले.

 या पत्रलेखनासाठी मुख्याध्यापक  सुनील पुजारी यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पुढील प्रमाणे विचार व्यक्त केले. लोकशाही म्हणजे अशी  राजकीय व्यवस्था की ज्यामध्ये लोकांना आपले शासनकर्ते बदलण्याचे नियमित घटनात्मक संधी मिळते आणि अशी सामाजिक व्यवस्था की ज्यामध्ये बहुसंख्य लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण धोरणांना निर्णयांना प्रभावित करण्याची संधी मिळते.  सार्वत्रिक निवडणुका हे लोकशाहीचे महत्त्व आहे असे विचार मांडले. सहशिक्षक रमेश चव्हाण, युवराज होळे, गोरख जगताप, अण्णाप्पा सातलगावकर, शुभांगी कारंजे, अर्चना जाधव, वर्षा जाधव यांनी विद्यार्थ्यांना पत्रलेखनाचे मार्गदर्शन केले, या पत्रलेखनामध्ये 317 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा यासाठी शाळेत निवडणूक क्लबची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती करणे, मतदानाचे महत्त्व सांगणे, मतदानाबाबत घोषवाक्य, रांगोळी स्पर्धा इत्यादी उपक्रम करणार आहेत. क्लबचे सदस्य म्हणून बागल राजनंदिनी,  शेंडगे, प्रियंका राठोड, वैष्णवी पिसके, संस्कृती कदम, वैष्णवी पवार आयोध्या कडदोरे, प्रियंका चव्हाण, इंद्रायणी जाधव ,लक्ष्मी पवार, ज्ञानेश्वरी पवार, गौरी पाटील, गायत्री वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. नियोजन प्रमुख शुभांगी कारंजे ,सातलगावकर अण्णाप्पा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.
या प्रसंगी मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत  केले.
 
Top