येवती येथील शंभर महिलांचा प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश
महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उज्वला गाटे यांच्या नेतृत्वाखाली घेतला शेकडो महिलांनी प्रवेश
तुळजापुर ,दि.०५
तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शेकडो महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या महिलांना प्रहार जनशक्ती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उज्वला गाटे यांच्या हस्ते सत्कार करून प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तुळजापूर तालुका महिला कार्यकारणीची निवड जाहीर करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार बच्चुभाऊ कडू, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येवती येथील प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या महिलांची, महिला आघाडी तुळजापूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी मिरा शिंदे, उपाध्यक्षपदी महानंदा शिंदे, पल्लवी शिंदे, शारदा शिंदे, तालुका सचिवपदी आयशा पठाण, प्रहार सैनिक प्रियंका ढोले, मिना ढोले, शाखा कार्याध्यक्षपदी सुवर्णा शिंदे, शाखा सहसचिवपदी राजश्री सरवदे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी वैष्णवी शिंदे, तसेच परंडा तालुका उपाध्यक्षपदी औदुंबर ठोंगे,तर महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा शिंदे यांची निवड जाहीर करुन मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उज्वला गाटे, परंडा तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे माजी जिल्हाध्यक्ष केदार सौदागर, यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे विविध पदाधिकारी येवती येथे गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.