महिला वाहक व चालक यांचा प्रामाणिकपणा : प्रवाशी वर्गातून कौतुक
वागदरी (एस.के.गायकवाड)
महिला ह्या कोणतेही काम प्रामाणिक पणे करतात .नेहमी सत्याचा आग्रह धरतात. आर्थिक व्यवहारात कधीही अफरातफर करताना दिसत नाहीत घेतलेले कर्ज नियमित प्रामाणिक पणे फरतफेड करतात म्हणूनच महिला बचत गटाना बँक कर्ज देण्यासाठी तयार होते. असाच प्रामाणिक पणा नुकतच महिला एस.टी. चालक व वहाका मध्ये दिसून आला.
याबाबत माहिती अशी की दि.०३ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारात नुकतेच रूजू झालेल्या महिला वहाक ज्योती गायकवाड व चालक संजीवनी गुरव यांनी सकाळी ८.३० वा.दरम्यान सोलापूर बसस्थानकातून सोलापूर ते नळदुर्ग सर्व ठिकाणी थांबणारी बस नळदुर्ग बसस्थानकात घेऊन आले. बसमधील सर्व प्रवासी नळदुर्ग बसस्थानकात उतरले असता वहाक ज्योती गायकवाड यांना बसमध्ये एक हजार रुपये पडल्याचे आढळून आले. तेंव्हा त्यांनी प्रवाशांना आवाहन केले की पैसे कोणाचे हरवले असतील तर ओळख पटवून घेऊन जावे परंतु पैसे घेण्यासाठी कोणीच पुढे आले नाही.त्यामुळे वहाक ज्योती गायकवाड व चालक संजीवनी गुरव यांनी ते पैसे प्रामाणिकपणे नळदुर्ग येथे कर्तव्यावर असलेले वहातुक नियंत्रक महेश डुकरे यांच्या कडे जमा केले. त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल प्रवाशी वर्गातून त्यांचे सर्वत्र आभिनंदन होते आहे.