जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग; मुरूम। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे उपक्रम

मुरूम दि..२२, 

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी विविध सामाजिक,शैक्षणिक,व्याख्यान,निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. दि.२१ वार रविवार रोजी मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी प्राचार्या महानंदा रोडगे, उपमुख्यध्यापक उल्हास घुरघुरे, प्रा.के.के. ब्याळे, प्रा.सतीश रामपुरे, प्रा.सूर्यवंशी,विवेकानंद परसाळगे, प्रा.बबलू अंबर, पोलीस उपनिरीक्षक गाडेकर, मंडळाचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाला. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. उल्हास घुरघुरे यांनी मनोगत पर बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकाश टाकत स्पर्धकांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे, आभार प्रा.नागनाथ बनसोडे यांनी मानले. अजय गायकवाड,ज्ञानसगर भालेराव,अमर भालेराव,अजय सुर्यवंशी,विकी बनसोडे आदींनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
 
Top