नळदुर्ग वागदरी व परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाने शेती पिकांचे नुकसान 

वागदरी ,दि.२२ एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वागदरीसह परिसरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले असून यामुळे शेती पिकांचे व फळझाडांचे मोठे नुकसान झाले.अनेकांच्य घरांवरची पत्रे उडून गेले,झाडे जमिनीवर कोसळली त्यामुळे वित्तहानी झाली मात्र कोठेही जिवीतहानी झाल्याचे समजले नाही.

  दि.२० एप्रिल २०२४ रोजी सकाळ पासुन तापमान वाढलेले होते.मोकळ्या हवेत देखील गरम हवा होती. पंख्याखाली बसले तरी गरम हवा त्यामुळे एसी.किंवा कुलरचा वापर करणारे मोजके लोक सोडले तर बाकी सर्व सामान्य माणसाचा‌ गरमीमुळे जीव कासावीस होत होता.त्यामुळे हवामानाचा अंदाज ऐकण्याची कोणालाही गरज पडलेली नाही.प्रत्येकजन म्हणत होता की आज संध्याकाळी मोठा पाऊस पडणार नेमके तसेच झाले.दुपारी ठिक ३.०० वाजल्यापासून आकाशात हळुहळू ढग भरून येत होते.हलकाशा थंड वारा ही सुटला आणि पाऊस पडणार याची खात्री पटली. बघताबघता पावसाचे थेंब ही पडायला सुरुवात झाली.सकाळ पासुन गर्मी ने कासावीस झालेल्या माणसाला थोडं फार बरं वाटतं होतं. पण दुपारी चार पाच वाजल्यापासून हलक्या वाऱ्याने उग्र रूप धारण केले पावसाच्या थेंबाचे मुसळधार पावसात रूपांतर झाले.विजेचा कडकडाट सुरू झाला.वादळीवाऱ्यास पावसाने नळदुर्ग वागदरी व परिसरास झोडपले.वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे जमीन दोस्त झाली.शेती पिकांचे ऊसाचे अंबा वगैरे फळ झाडाचे मोठे नुकसान झाले.गावागावाती घरावरचे पत्रे उडून गेले.शेतातील पत्र्याचे शेड उडून गेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली पण जिवितहानी कोठे झाल्याचे समजले नाही.पाणी टंचाईचा सामना करण्याऱ्याना या अवेळी पडलेल्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला असला तरी पाणी टंचाईची समस्या पुरेसा पाऊस आल्याशिवाय मिटणार नाही.हे तितकेच खरे आहे.
 
Top