अवकाळी पावसात वीज पडून सात शेळ्या दगावल्या तर एक जखमी


मुरूम, ता. उमरगा, दि. २० 

मुरुम येथील शिवारालगत शिव मारुती रोडवर असलेल्या शेतात शेळीपालन करणारे बिया शेख कारभारी हे  शेताच्या बंधाऱ्यावर शेळी चारत असताना दुपारी ३ वाजता अचानक आलेल्या अवकाळी पाऊसात शेळ्या झाडाखाली थांबल्या होत्या. अचानक त्या ठिकाणी वीज पडून सात शेळ्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या तर मुरुम येथील अशोक तुकाराम देडे  हे जखमी झाले. जखमीवर मुरूम ग्रामीण रुग्णालयात  प्राथमोपचार करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश आरदले यांच्या तपासणीनंतर उमरगा तहसीलदार यांच्याकडे या घटनेची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.                     

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील मुरूमच्या शिवारात अवकाळी पावसात वीज पडल्याने सात शेळ्या दगावल्या.
 
Top