लोहगाव, दि.२०

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे सामाजिक भावनेने ग्रामस्थानी एकञ येत एका गरीब कुटूंबातील मुलीच्या लग्नाकरीता सुमारे एक लाख रुपये गोळा करुन लग्नास मदत केल्याने याबाबत  गावक-यांचे सर्वञ कौतुक होत आहे.


एका गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्यात आली, या कुटुंबातील मुलीचे आई व वडील अपंग व एकुलता एक भाऊ नळदुर्ग येथे काम करुन घरची उपजीविका भागवितो व बहिणीच्या लग्नासाठी आता कुठुन पैसे जमा करायचे हा सर्वांत मोठा प्रश्न त्याच्या समोर होता.

यावेळी गावातील काही तरुण मित्रांनी लोहगाव नगरी मधील व्हाट्सअप ग्रुप वर या कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी मदतीचे आव्हान केले.
 या आव्हानाला लोहगाव ग्रामस्थांनी उत्सर्फुतपणे  प्रतिसाद देत  एक लाख रुपयांची या कुटुंबाला मदत करण्यात आली. सदरील रक्कम गावकऱ्याच्या वतीने या कुटूंबास सुपूर्द करण्यात आली
 
Top