धरित्री विद्यालयात  बिनखर्चात साहित्य निर्मिती  कार्यशाळा संपन्न    
          
नळदुर्ग ,दि. ०२            

  धरित्री विद्यालय आलियाबाद येथे  आयोजित  कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण या माध्यमातून शाळेचे मुख्याध्यापक  सुनील पुजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना   कार्यानुभव विषयातील समाजासाठी मौल्यवान  वस्तु नारळाच्या करवंटीपासून फुलदाणी बनवणे ,खोक्यापासून शिल्प तयार करणे ,पञावळी व द्रोण तयार करणे,पंखा तयार करणे ,मातीपासून प्राणी, पक्षी तयार करणे ,बाहूली तयार करणे ,रांगोळीचे साचे तयार करणे ,आगपेटीपासून गाडया सोफा तयार करणे ,आईस्क्रीम चमचे वापरुन खुर्ची तयार करणे ,सुतळीपासून वाॅलपीस ,एकलिटर पाण्याच्या बाटल्यापासून कुंडया,उडया मारणारा बेडूक तयार केले,शीतपेयांच्या झाकणापासून तोरणे , उत्पादक याविषयी माहिती सांगितली. तसेच यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,आपलेपणा, जबाबदारी,कार्यक्षमता, प्रामाणिकपणा,   शिस्त  व कर्तव्यासाठी समर्पण करणे यासारख्या चांगल्या गोष्टी विकसित होतात . तसेच विषय शिक्षक  चव्हाण रमेश यांनी कार्यानुभव विषयाचे महत्व व त्याचे व्यवस्थापन खरेदी,  टाकाऊपासून टिकाऊपणा कार्यक्षमपणा, सखोल माहिती दिली.


  विद्यार्थ्यांकडून  टाकाऊपासून टिकाऊ झुंबर, प्रतिकृती, फुलदाणी,टोपली, चटई, तसेच पानापासून पत्रावळी द्रोण कागदापासून पक्षी,प्राणी, फुले, कागदी तोरण,  माती पासून प्राणी, पक्षी, फळे,फळभाज्या, विविध आकाराच्या वस्तू या कार्यशाळेत  करून घेण्यात आले. सदरील कार्यशाळेस स्वतः विद्यार्थ्यांनी वस्तू निर्मितीसाठी सर्व साहित्य घेऊन आले होते. इयत्ता पाचवी ते नववीतील  विद्यार्थी  सहभागी झाले होते. ही कार्यशाळा  पार पाडण्यासाठी कार्यानुभव शिक्षक  चव्हाण रमेश  सातलगावकर अण्णाप्पा  व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
 
Top