वागदरी येथे श्री संत भवानसिंग महाराज मंदीर यात्रा संपन्न : हजारो भाविक भक्तानी घेतले महाराजांचे दर्शन

वागदरी,दि.०३ एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातिल वारकरी सांप्रदायाचा वारसा जोपासणारे गाव म्हणुन ओळखले जाणा-या वागदरी जिल्हा धाराशिव येथे श्री संत सदगुरू भवानसिंग महाराज मंदिर याञा मोठ्या उत्साहात  व विविध धार्मीक कार्यक्रमाने  संपन्न झाली.

  श्री सदगुरू संत भवानसिंग महाराज यांच्या मुळेच वागदरी गावाला वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेला असून दर वर्षी श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळ,याञा कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने ग्राम दैवत श्री सदगुरू संत भवानसिंग महाराज यांची याञा भरवली जाते. याही वर्षी दि. ३१ मार्च व १ एप्रिल २०२४ रोजी दोन दिवसिय याञा भरविण्यात आली होती.याञे निमित्ताने दि.३१ मार्च रोजी अक्कलकोट तालुक्यातील मौजे चुंगी येथुन प्रतिवर्षा प्रमाने सायंकाळी ठिक ६.०० वा.दरम्यान श्री संत भवानसिंग महाराज यांच्या पालकीचे आगमन वागदरी गावात झाले.गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ मृदंगाच्या गजरात पालकीची मिरवणूक काढण्यात आली.राञभर चक्री भजन,प्रवचण,हरी जागर,किर्तन आदी धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   
 दि.१ एप्रील रोजी सकाळी १०.३० वा.पासून विविध गावातून आलेल्या टाळकरी दिंडीच्या पाऊलाचे (खेळाचे) सादरीकरण व अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.शेवटी दुपारी २.३० वा दरम्यान लाही फोडून याञा महोत्सवाची सांगता करण्यात आली.या प्रसंगी वागदरी,नळदुर्ग,शहापूर, गुजनूर, दहीटण़ा, खुदावाडी,लोहगाव,नंदगाव,होर्टी,मुर्टा,चिकुंद्रा,किलज,
सराटीसह परिसरातिल हजारो भाविक भक्तानी घेतले श्री संत भवानसिंग महाराज व श्री संत चोखाबा महाराज यांच्या समाधीचे दर्शन.
 
Top