तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ), मंगरूळ, चिकुद्रा येथील ग्रामसेवकांवर  शिस्तभंगाची कार्यवाही करून निलंबीत करण्याची मागणी

नळदुर्ग, दि.०४

मुख्याध्यापक, शिक्षक मुख्यालय राहत असल्याचे बोगस ग्रामसभेचे ठराव देऊन शासनाची फसवणुक करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ), मंगरूळ, चिकुद्रा येथील ग्रामसेवकांची चौकशी करून  याप्रकरणी शिस्तभंगाची कार्यवाही करून निलंबीत करण्याची मागणी अन्याय, अत्याचार विरोधी समितीच्या वतीने धाराशिव जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी, तुळजापूर प.स.चे गटविकास अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, चिकंद्रा, जळकोटवाडी (नळ) येथील जि.प. शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयात राहत असल्याची माहिती महितीअधिकारात मागवली होती. संबंधीत ग्रामसेवक यांनी त्या त्या गावातील शिक्षकांना मुख्याध्यापकाला सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मुख्यालय राहत असल्याचे ग्रामसभेचे ठराव देण्यात आले. विशेष म्हणजे संबंधीत ग्रामसेवक हे मुळ सध्याच्या ठिकाणी न राहता ते आपआपल्या गावावरून ये-जा करतात संबंधीत गावातील लोक आमच्या घरामध्ये शिक्षक राहतात म्हणुन ठरावामधील नावे नमुद करून दिलेले आहेत. हा गैरप्रकार शिक्षक व ग्रामसेवक यांनी संगणमताने करून शासनाची फसवणुक केलेली आहे. संबंधीत ग्रामसेवक हे आपल्या अर्थिक फायदयासाठी हे काम केल्याचे म्हटले  आहे. त्या संबंधित  ग्रामसेवकांनी  ग्रामपंचायतमधील केलेल्या गैरप्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधीत ग्रामसेवकांनी जे ठराव दिलेले आहेत. त्या ठरावाची सखोल चौकशी करून संबंधीत ग्रामसेवक व मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावर शिस्त भंगाची कठोर कार्यवाही करून निलंबीत करण्याची मागणी  केली आहे.
या निवेदनावर आन्याय आत्याचार विरोधी समिती आल्पसंख्यांक विभागाचे सय्यद अजिज फजल यांची स्वाक्षरी आहे.
 
Top