धाराशिव ,दि.०५

धाराशिव (उस्मानाबाद ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिवच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जल्लोष करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.


देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून बऱ्याच दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा  उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष मा.खा सुनील तटकरे  तसेच पक्षाचे प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये सौ. अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला. पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित  पवार व प्रदेशाध्यक्ष मा.खा सुनील तटकरे यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार सौ. अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचे  नाव पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात आले 



त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, व महायुतीतील घटक पक्षाच्या च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पदाधिकारी यांना पेढे भरवून, फटाके फोडून  आतिष बाजी करन्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी,शिवसेना पक्षांचा व प्रमुख नेते यांच्या नावाचा जयघोष करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर यांनी पक्षाला मिळालेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती  पक्षाच्या वतीने भरघोस मतांनी विजयी करू. विजयाचा गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल असा विश्वास पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिला.

   यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, अकबर खान पठाण, धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र शिरसागर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असदखान पठाण,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,धाराशिव युवक जिल्हा उपाध्यक्ष आशिष पाटील,धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे,युवक जिल्हा संघटक सुदर्शन करंजकर ,धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार,सुरेखा चव्हाण, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे,धाराशिव महिला शहर उपाध्यक्ष हसीना पटेल,धाराशिव महिला सचिव लैला शेख,केशेगाव जि प गटप्रमुख लिंबराज लोखंडे,अंबेजवळगा जि.प. गटप्रमुख सुरेश राठोड,शिंगोली  पंचायत गणप्रमुख बाबासाहेब पवार,विनोद अवतारे,बालाजी जावळे,सुहास मेटे,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष पणगुडे ताई, राहुल काकडे विलास सांजेकर, शेषेराव उंबरे,  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भा.ज.प, शिवसेना व महायुतीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top