नळदुर्ग येथील ९३ कोटीच्या विकासकामांना मुहूर्त मिळेना? 

नळदुर्ग,दि.०६

नगरोत्थान महाभियानातर्गत नगरपरिषद हद्दीतील जवळपास 20 ठिकाणची मोठे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियेत  वेळ गेला असून कृष्णाई इन्फ्रास्ट्रकचर या नोंदणीकृत ठेकेदार कंपनीस कामाचा ठेका मिळाला आसल्याचे समजते. दरम्यान कार्यारंभ आदेश देऊन एक महिना होत आला तरीही कामाला मुहूर्त मिळत नाही,आचार संहितेपूर्वी उदघाट्नाची उरकले. ठेकेदार व अधिकारी आता विनाकारण कामास विलंब लावताना दिसून येत आहेत,या रस्त्याची कामे झाल्यास शहरात रस्त्याचे जाळे विनले जाणार असून नागरिकांना मोठ्या सोयीचे होवुन दिलासा मिळणार आहे.

कधी नव्हे ते 93.42 कोटी इतका निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पार पाडली व कार्यारंभ आदेश हि निघाला,परंतु नागरिकांची प्रतीक्षा मात्र अजूनही संपली नाही. या कामास प्रत्यक्ष मुहूर्त स्वरूप कधी प्राप्त होईल,ठेकेदार कामास सुरुवात करणार का? सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारास  काम सुरु करण्याच्या सूचना देण्याची मागणी शहरवाशीयातुन होत आहे.
 
Top