भाजी विक्रेता आशिष वाघमारेनी मुंबई विद्यापिठातून इलेक्ट्राॅनिक इंजनिअरची पदवी  मिळविले 

नळदुर्ग,दि. ०६ एस . के. गायकवाड 

आशिष सुनिल वाघमारे यांनी मुंबई विद्यापिठातून इलेक्ट्राॅनिक इंजनिअर या क्षेञातील पदवी संपादन करून  यश मिळविले आहे. वागदरी ता.तुळजापूर येथील मुळ रहिवाशी असलेले आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले सुनिल भिमा वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत.

 मुंबई येथे छोट्याशा घरात राहून फुटपाथ वर भाजी विक्रीचा धंदा करत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण करून मुंबई महानगरपालिकेच्या  आखत्यारित असलेली बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यामध्ये सुरूवातीला वाहक म्हणून सेवा करून सध्या बस प्रवर्तक म्हणून कार्यरत असलेले वागदरी ता.तुळजापूर गावचे सुपुत्र सुनील भीमा वाघमारे यांचे चिरंजीव कुमार आशिष सुनील वाघमारे यांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर या क्षेत्रातील पदवी संपादन केली आहे.

 मुंबई विद्यापिठाने आयोजीत केलेल्या पदवीदान समारंभात त्याना सदर पदवी प्रमाणपञ देवून सन्मानित करण्यात आले. त्यानी मिळविलेल्या याशाबद्दल त्यांचे सर्वञ आभिनंदन होत आहे .
 
Top