महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी जाहिर होताच नळदुर्ग शहरात स्वागत

नळदुर्ग,दि.० ८

धाराशिव लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून नाव जाहीर झाल्याने नळदुर्ग शहर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून अर्चना पाटील यांच्या उमेदवारीचे उत्साहात  स्वागत केले.
   
धाराशिव लोकसभा मतदार संघात गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या उमेदवार ठरत नव्हता. त्यामुळे महायुतीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दि.  ४ एप्रिल रोजी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश होऊन त्यांची उमेदवारी जाहीर झाली. 
   धाराशिव लोकसभा मतदार संघात अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार म्हणून निश्चित झाल्यानंतर संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पाटील यांच्या उमेदवारीचे जल्लोष करत स्वागत केले. तर नळदुर्ग येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीचे  उत्साहात  स्वागत केले.
    
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नय्यर जहागिरदार, सामाजिक कार्यकर्ते  संजय विठ्ठल जाधव, भाजपचे सरचिटणीस श्रमिक पोतदार,  शहराध्यक्ष धिमाजी घुगे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. धाराशिव लोकसभा मतदार संघात २००४ नंतर प्ररथमच अर्चना पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवार मिळाला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या अर्चना पाटील विजयी झाल्या तर कल्पना नरहिरे यांच्यानंतर दुसऱ्या महिला खासदार होण्याचा बहुमान अर्चनाताई पाटील यांना मिळणार आहे. 
   
धाराशिव लोकसभा मतदार संघात आता महायुतीच्या अर्चनाताई पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात  लढत होणार आहे. कारण या मतदार संघातील सहा पैकी  तुळजापूर, उमरगा- लोहारा, भूम-परंडा-वाशी, औसा व बार्शी या पाच विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. तर फक्त एक धाराशिव-कळंब या एकमेव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा आमदार आहे.
   
 
Top