जळकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्षपदी प्रदिप लोखंडे  तर उपाध्यक्षपदी सागर लोखंडे


वागदरी, एस.के.गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वी जयंतीच्या अध्यक्षपदी प्रदिप लोखंडे तर उपाध्यक्षपदी सागर लोखंडे यांची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली.

सदरची बैठक प्रकाश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन अरुण लोखंडे आणि अकूंश लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशिल घेण्यात आले व बैठक सुरुवात करून सचिव म्हणुन प्रकाश लोखंडे, सहसचीव सतीश माने, सल्लागार म्हणुन अरविंद लोखंडे, सुनिल माने, अभिमन्यू लोखंडे तर मिरवणूक प्रमुख म्हणून परमेश्वर लोखंडे, लक्ष्मण लोखंडे, प्रविण लोखंडे, मुकेश लोखंडे ,स्वदेश लोखंडे, रोहन काबळे  आदीची निवड करण्यात आली. सदर बैठकीस रमेश लोखंडे, गजानन लोखंडे, विनोद लोखंडे, इंद्रजित लोखंडे, अशुतोष भालेराव, हरिदास लोखंडे, हणमंत लोखंडे, तुकाराम लोखंडे, शिवाजी लोखंडे,अनिल पासोडे, गणेश  लोखंडे ,राजेद्र लोखंडे, बिभिसेन लोखंडे ,अक्षय सुरवसे ,गौतम लोखंडे, सुमंत लोखंडे, अविनाश लोखंडे, युवराज लोखंडे ,भानुदास लोखंडे ,नारायण लोखंडे, विठल लोखंडे, गोयल मनोहरे, रोहीत माने, अजय लोखंडे सह युगपुरुष तरुण मंडळाचे सर्व सदस्य्य भिमनगर मधील महिल  उपस्थित होते. १४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालवधीध्ये मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
 
Top