महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांची जयंती विविध प्रबोधनात्मक उपक्रमाने होणार साजरी     
               
मुरूम, ता. उमरगा, दि. ९  

भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने महात्मा  फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  संयुक्तरित्या जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने दि. ११ ते २८ या कालावधीत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. 

दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वा. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भीमनगर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळा व परिसर स्वच्छता अभियान,         दि. १४ रोजी सकाळी ९ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व ध्वजारोहन तर दुपारी १२ ते ५ पर्यंत कुमारी मोनिका प्रतिक फुगारे-भालेराव यांच्या वतीने स्नेहभोजन, सायं. ६ वा. शहरातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन, ता. १५ रोजी सायं ७ वा. वक्तृत्व स्पर्धा, ता. १६ रोजी निबंध स्पर्धा, ता. १७ रोजी सर्वरोग निदान शिबिर व सायं. ७ वा  छत्रपती संभाजीनगर येथील चेतन चोपडे प्रस्तुत तुझ्या पाऊल खुणा भीमराया हा संगीत रजनी कार्यक्रम, दि. १८ रोजी आधारकार्ड नोंदणी, दुरुस्ती, पोस्ट खाते व जात प्रमाणपत्र काढणे आदी भारत गायकवाड यांच्या वतीने मोफत आयोजन, सायं. ७ वा. सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. मिना देवीदास गायकवाड यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्रीविषयक विचारांची काळसमर्पकता या विषयावर व्याख्यान, ता. १९ रोजी महिलांसाठी पाककला व सायं. ७ वा. अंबेजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांचे अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान, ता. २० रोजी रांगोळी, प्रश्न मंजुषा स्पर्धा, ता. २१ रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा, ता. २२ रोजी पूर्णा येथील भन्ते डॉ. भदंत उपगुप्त महा थेरो यांचे धम्मदेसना, ता. २३ रोजी बुद्धिबळ स्पर्धा व सायं. ७ वा. कवी रवींद्र केसकर यांचे सर्वांची आई-माता रमाई या विषयावर व्याख्यान, ता. २४  रोजी विविध गुण दर्शन, ता. २५ रोजी मान्यवरांचा सत्कार व बक्षीस वितरण, ता. २६  रोजी कुणाल वराळे, छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत युगपुरुष हा संगीत रजनी कार्यक्रम, दुपारी १२ ते ५ या वेळेत शिवाजी कांबळे यांच्या वतीने स्नेहभोजन, ता. २८ रोजी दुपारी ३ वाजता गौतम बुद्ध, जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात येणार असल्याने तालुका व परिसरातील फुले-शाहू-आंबेडकर विचाराच्या अनुयायांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, सचिव चंद्रकांत गोडबोले व कोषाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी केले आहे.
 
Top