शाळेत राबविले वसंत  ऋतुच्या आगमनाचे व हिंदू नववर्षाचे निमित्त  पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती प्रेरणादाई  उपक्रम 

तुळजापूर , दि.१०

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बु जि .प . शाळेत वसंत ऋतुच्या आगमनाचे व हिंदू नववर्षाचे निमित्त साधत पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती प्रेरणा देणारा व पुस्तकाचा सन्मान करणारा उपक्रम घेण्यात आला .शिक्षण विभागाकडून सध्या महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येत आहे . या उपक्रमाचा प्रसार व त्यास बळकटी देणारा हा प्रयोग शाळेने वैशिष्य पूर्ण रितीने राबवला आहे .उपसरपंच विजयकुमार जाधव यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी मुख्याध्यापक महादेव वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती .

गुढी ज्ञानाची -गुढी परिवर्तनाची -वाचन संस्कृती वाढीची असा नारा देत मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे असा यामागील उद्देश होता . शालेय ग्रंथालयातील पुस्तके  ,गोष्टीची पुस्तके व शालेय पाठ्यपुस्तके एकावर एक ठेवून उंच गुढी उभारली .  काठीवर उभारलेल्या गुढीस पुस्तकांचा हार व त्यास कडुलिंबाच्या व तुळशीच्या फांद्या बांधल्या होत्या .औषधी वनस्पतीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित करत त्यांचा प्रचार व प्रसार करणे व अशा वनस्पतींची जोपासना भावी पिढीकडून होणे आवश्यकच . शिवाय त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजन ही करण्यात आले .

यावेळी झालेल्या कार्यक्रमात विठ्ठल नरवडे यांनी सध्याच्या युगात शिक्षण हाच यशाचा मूलमंत्र असून मुलांनी बालवयापासून वाचनाची गोडी जपावी , वाचनातून ज्ञान वाढवावे , ते ज्ञान ज्या पुस्तकातून मिळते त्या पुस्तकांनाच मित्र बनवा असे सांगत आवडीच्या पुस्तकांनी याचा प्रारंभ करण्याचं आवाहन केले . तसेच या सणांचे पारंपारिक महत्त्व , वैज्ञानिक आधार ,ही स्पष्ट केला व औषधी वनस्पती जोपासण्याचे महत्त्व विशद केले .हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव वाघमारे , विठ्ठल नरवडे , स्वाती बळे , प्रीती कोकोडे यांनी  योगदान दिले .





 
Top