मुरूम शहरात रमजान ईद उत्साहात, एकमेकांना गळाभेट करून दिल्या शुभेच्छा


मुरूम, ता. उमरगा, दि. ११ 

 रमजान ईद निमित्त मुरूम शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आली. संपूर्ण सृष्टीवर सुख, समृद्धी, शांती राहो यासाठी अलाहाकडे प्रार्थना करण्यात आली. शहरातील मर्कज मस्जिद, अबू बकर मस्जिद, बिलाल मस्जिद, जामा मस्जिद, नूराणी मस्जिद, कुरेशी मस्जिद याठिकाणी रमजान ईद निमित्त नमाज पठण करुन एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृतीतील विविध सण हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहेत. त्यातीलच एक सण म्हणजेच रमजान ईद होय. गुरुवारी (ता. ११) रोजी शहरात रमाजन ईद निमित्त शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रपरिवारांना मुस्लिम बांधवाच्या वतीने निमंत्रण दिले जाते. ईद निमित्त दूध, शेवया, काजू, बदाम, किसमिस यासह विविध ड्रायफ्रूट पासून बनवलेला पदार्थ शूरखुमा, गुलगुल्याचा भोजनाचा बेत असतो. शहरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोक बंदोबस्त लावून सहकार्य करण्यात आले. तर सृष्टीवर सुख, समृद्धी, शांततेसाठी आयुबा मौलाना यांनी मार्गदर्शन केले. समाज बांधवानी माणुसकी जोपासण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहान यावेळी केले.                                    

फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करताना मौलनासह मुस्लिम बांधव.
 
Top