श्रीमंत जानोजीराजे भोसले यांची 252 वी पुण्यतिथी साजरी
नळदुर्ग, दि.१८
तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे , ऐतिहासिक वारसा असलेले , ठिकाण. सेना साहेब सुभा सरदार नागपूरकर श्रीमंत जानोजीराजे भोसले यांची 252 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली व समाधी पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी येडोळा गांवचे जेष्ठ माजी पोलीस पाटील श्री शाहूराज पाटील, युवा उदयोजक राजकुमार जाधव , राजेंद्र जाधव मेजर शिवसेना उ. बा. ठा. तालुकाप्रमुख ग्राहक कक्ष तुळजापूर , रवि पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुका सरचिटणीस तुळजापूर , चेतन जाधव दिगंबर पाटील ग्रा. प सदस्य , पांडुरंग जाधव , रामचंद्र जाधव ,धोंडबा केदार , नवनाथ जाधव भा. ज. पा. उपाध्यक्ष , वैजनाथ जाधव , राष्ट्रवादी युवा काँग्रेस शरदचंद्र पवार युवा कार्यकर्ते गोवर्धन लोंढे , भास्कर शित्रे , दत्तात्रय जाधव , प्रवीण कांबळेसह ग्रामस्थ, शिवभक्त व इतिहास प्रेमी नागरिक
उपस्थिती होते.